Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७ या रिऍलिटी शोने प्रक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता मात्र या शोचा फिनाले काही दिवसांवर आला आहे. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी व मन्नारा चोप्रा हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडे व अभिषेक कुमार यांचा प्रवास व्हिडीओ आतापर्यंत दाखवण्यात आला आहे.
अंकिता लोखंडे ही टॉप पाच स्पर्धकांपैकी एक आहे. प्रवासाच्या व्हिडीओदरम्यान ‘बिग बॉस’ने अंकिताला नातेसंबंध जपणारी मुलगी म्हटले. तिच्या प्रवासाचा व्हिडीओ पाहताना अंकिताने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असताना अंकिता बरेचदा भावूक झाली तर कधी तिने रागही दाखवला. मन्नारा व खानजादीचे वागणे पाहून अंकिताला खूप राग आला. व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले की, जेव्हा अंकिताची सासू व विकी जैनची आई शोमध्ये दाखल झाली तेव्हा अंकिताने चेहऱ्यावर भाव नसलेली प्रतिक्रिया दिली. पण जेव्हा विकीच्या आईने अंकिताच्या वडिलांचा व आईचा उल्लेख केला तेव्हा अंकिता चांगलीच संतापलेली दिसली.
विकीची आई शोमध्ये आली तेव्हा अंकिता व त्यांच्यात संवाद झाला. त्यादरम्यान विकीच्या आईने सांगितले होते की, “जेव्हा तू विकीला लाथ मारली होतीस, त्यावेळी विकीच्या वडिलांनी तुझ्या आईला फोन करुन विचारले होते की, तू तुझ्या पतीलाही अशीच लाथ मारतेस का?”. अंकिताला विकीच्या आईच बोलणं आवडलं नाही. सासू-सासऱ्यांना गप्प बसवत ती म्हणाली की, “तुम्ही मला किंवा विकीला जे काही बोलायचे आहे ते बोला पण माझ्या आई-वडिलांकडे जाऊ नका”.
अंकिताने तिचा पती विकीसह ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये दोघांमध्ये अनेकदा मारामारी झाली. अंकिताने मस्करीमध्ये विकीला चप्पल फेकून मारली. तर एका भागात लाथ मारल्याचा उल्लेखही होता. अंकिताच्या सासरच्या मंडळींना अंकिताचं हे वागणं आवडलं नाही. विकीच्या आईने तर मीडियासमोर हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाले असल्याचं सांगितलं.