शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Vicky kaushal starrer sam bahadur ott release date out film will release on zee 5 at 26th January see the details

चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

गेल्या वर्षात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’, ‘अॅनिमल’, व ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांनी ऑक्स ऑफिस कलेक्शनसह प्रेक्षकांच्या मनाचादेखील ठाव घेतला. या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. अशातच आता ओटीटीवरही हे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहेत. विकी कौशलचा सॅम बहादूर या चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादुर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तसेच फातिमा सना सेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांनीही चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. 

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुला असं पाहण्याचे दु:ख…”, अंकिता लोखंडेला ढसाढसा रडताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली, “मला विश्वास आहे की…”

झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची माहिती दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, “एक दूरदर्शी नेता आणि एक खरा नायक – सॅम. तुमच्या स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे.” ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list

दरम्यान, ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ९३ कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाची जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई झाली.  सॅम बहादुर  या चित्रपटाची रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. तरीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळाले.

Tags: bollywood actorBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood moviesentertainment newsottott releasesam bahadurvicky kaushalZee-5ओटीटीओटीटी प्रदर्शनझी-५बॉलिवूड अभिनेताबॉलिवूड चित्रपटबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीविकी कौशलसॅम बहादूर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

Bigg Boss 17 : फ्रान्समध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी कळली अन्…; 'त्या' व्यक्तीने अंकिता लोखंडेला सांगितली सत्य परिस्थिती, लोक रडू लागले आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.