शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परदेशात लेकीला पूजा करायला शिकवत आहे प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या संस्कारांचं कौतुक अन् फोटो व्हायरल   

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood actress Priyanka chopra shared photo with her daughter malti see the details

परदेशात लेकीला पूजा करायला शिकवत आहे प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या संस्कारांचं कौतुक अन् फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये ‘देसी गर्ल’ म्हणून आपली एक वेगळे ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने निक जोनासबरबर लग्न केले असून त्या दोघांना एक कन्यादेखील आहे आणि तिचे नाव मालती असं आहे. प्रियांका ही तिच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहत असते. अशातच तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे लाडक्या लेकीची काही फोटो शेअर केले आहेत. नुकताच प्रियांका व निकने खास अंदाजमध्ये मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. मालतीच्या या वाढदिवसाचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Priyanka chopra On Instagram)

नुकताच मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. आणि या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लाडक्या लेकीचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये मालतीच्या गळ्यात एक मोठा हार घातलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मालतीने गुलाबी रंगाचा टॉप, लाल रंगाची पँट आणि हार्टच्या आकारचा गॉगल घातला आहे. तर आणखी एका फोटोमध्ये मालती आपल्या आईच्या कडेवर बसून देवाचे दर्शन घेताना दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये ती तिच्या वडिलांसह दिसत आहे. या सगळ्या फोटोमध्ये मालतीची निरागसता दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

आणखी वाचा – “तिच्या आईबरोबर असते तेव्हा…”, आदिनाथ कोठारेने सांगितलं त्याचं कसं आहे लेकीबरोबर नातं, म्हणाला, “आम्ही दोघं…”

या सगळ्या फोटोंमध्ये प्रियांका व निकच्या फोटोंनीही नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांकाने निकला मिठी मारल्याचा फोटो खूपच सु्ंदर आहे. हे फोटो पाहिल्यानंतर प्रियांका व निकच्या चाहत्यांनी मालतीला तिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त कमेंट्सद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी व मराठी कलाकरांसह अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्याची ‘धर्मवीर २’ चित्रपटात वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका, खास फोटो शेअर करत म्हणाला…

अनेकांनी या फोटोखाली “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मालती. तू खूप सुंदर दिसत आहेस. मालती अगदी परीसारखी दिसत आहे. खुपच गोड, खुपच सुंदर” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी प्रियांका व निकच्या लाडक्या लेकीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचे कौतुकही केले असल्याचे दिसत आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsMaltinick jonaspriyanka chopraPriyanka Chopra Daughterनिक जोनासप्रियांका चोप्राप्रियांका चोप्रा मुलगीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमालती
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood actress Devoleena Bhattacharjee reaction on bigg boss 17 torture task and said ankita lokhande is wrong

Bigg Boss 17 : “तो आधीपासूनच भित्रा अन्...”, देवोलिना भट्टाचार्जीचे अंकिता लोखंडे व विकी जैनवर आरोप, म्हणाली “ती पूर्णपणे चुकीची...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.