बॉलिवूडमध्ये ‘देसी गर्ल’ म्हणून आपली एक वेगळे ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने निक जोनासबरबर लग्न केले असून त्या दोघांना एक कन्यादेखील आहे आणि तिचे नाव मालती असं आहे. प्रियांका ही तिच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहत असते. अशातच तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे लाडक्या लेकीची काही फोटो शेअर केले आहेत. नुकताच प्रियांका व निकने खास अंदाजमध्ये मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. मालतीच्या या वाढदिवसाचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Priyanka chopra On Instagram)
नुकताच मालतीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. आणि या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लाडक्या लेकीचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये मालतीच्या गळ्यात एक मोठा हार घातलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मालतीने गुलाबी रंगाचा टॉप, लाल रंगाची पँट आणि हार्टच्या आकारचा गॉगल घातला आहे. तर आणखी एका फोटोमध्ये मालती आपल्या आईच्या कडेवर बसून देवाचे दर्शन घेताना दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये ती तिच्या वडिलांसह दिसत आहे. या सगळ्या फोटोमध्ये मालतीची निरागसता दिसून येत आहे.
या सगळ्या फोटोंमध्ये प्रियांका व निकच्या फोटोंनीही नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांकाने निकला मिठी मारल्याचा फोटो खूपच सु्ंदर आहे. हे फोटो पाहिल्यानंतर प्रियांका व निकच्या चाहत्यांनी मालतीला तिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त कमेंट्सद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी व मराठी कलाकरांसह अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
अनेकांनी या फोटोखाली “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मालती. तू खूप सुंदर दिसत आहेस. मालती अगदी परीसारखी दिसत आहे. खुपच गोड, खुपच सुंदर” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी प्रियांका व निकच्या लाडक्या लेकीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचे कौतुकही केले असल्याचे दिसत आहे.