शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नात बायकोला दिलं ५० कोटी रुपयांचं गिफ्ट, आता ‘बिग बॉस १७’मधील बहुचर्चित कपल घटस्फोटाच्या मार्गावर, सासूबाईंशीही पटेना अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2024 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Ankita lokhandes husband Vicky jain gifted ankita lokhande villa in Maldives worth 50 crores rs

लग्नात बायकोला दिलं ५० कोटी रुपयांचं गिफ्ट, आता 'बिग बॉस १७'मधील बहुचर्चित कपल घटस्फोटाच्या मार्गावर, सासूबाईंशीही पटेना अन्...

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार मंडळी मोठ्या थाटामाटात विवाह करत असतात. अनेक् कलाकारांची लग्न ही अगदी शाही पद्धतीने आणि दिमाखात पार पडल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या लग्नात एकमेकांना महागड्या भेटवस्तूही देत असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जिला तिच्या लग्नात पतीकडून तब्बल ५० कोटी रुपयांचे गिफ्ट मिळाले होते आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अंकिता लोखंडे आहे. पती विकी जैनने अंकिताला लग्नात ५० कोटी रुपयांची खास भेटवस्तू दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. विकीने अंकिताला लग्नात भेट म्हणून मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकितानेदेखील विकीसाठी एक खासगी यॉट भेट म्हणून दिली आहे. या यॉटची किंमत ही ८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अंकिता-विकी या जोडीने एकत्र या शोमध्ये एण्ट्री घेतली. पण या शोमध्ये दोघेही अनेकदा भांडताना दिसले आहेत. अनेकवेळा विकीने अंकितावर आरडाओरड केली आहे, तर अनेकवेळा अंकिताही विकीवर रागावतानाही दिसली आहे. या शोमध्ये दोघांमधील भांडण अनेकवेळा इतके टोकाला गेले असल्याचे पाहायला मिळाले आहे की, या भांडणांमुळे अंकिताने विक्कीपासून दूर जाण्याबद्दलही भाष्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – अयोध्यामध्ये हेमा मालिनी नृत्य सादर करणार, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी, म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच…”

गेले काही दिवस या दोघांमधले वाद खूपच विकोपाला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच या घरात विकीच्या आईने एण्ट्री घेतली होती तेव्हादेखील  त्यांनी अंकिता-विकी यांच्या नात्यावर भाष्य केले होते. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागांत अंकिताने विकीला “मी तुझ्या आयुष्यातून जात आहे” असं म्हटलं. यावरुन सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – मिताली मयेकरच्या साध्या पण हटके मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच खास, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले असल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच त्यांच्या नात्याबद्दलही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. पण आता स्वत: अभिनेत्रीने असे विधान केल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

Tags: ankita lokhandeBigg Boss Famebollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsvicky jainअंकिता लोखंडेबिग बॉस फेमबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood actress zareen khan feels sad for ankita lokhande Vicky jain and kishwer merchant is bored of their fights

Bigg Boss 17 : “आम्ही आता वैतागलो आहोत...”, अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं बॉलिवूडलाही पटेना, अभिनेत्री म्हणाली “वाईट वाटतं की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.