नुकताच काल (१५ जानेवारी) रोजी देशभरात सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला. देशभरात विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. सर्वांनीच पतंग उडवत व तिळगूळ खात हा सण साजरा केल्याचे पाहायला मिळाले. मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांनी मकरसंक्रांतीनिमित्त खास काळ्या रंगाचा लूक करत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Mitali Mayekar On Instagram)
अभिनेत्री मिताली मयेकरनेदेखील मकरसंक्रांतीनिमित्त तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मिताली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मिताली सोशल मीडियावर कधी मॉडर्न तर कधी पारंपरिक फोटो शेअर करत असते आणि तिच्या या फोटोंना चाहतेदेखील चांगलीच पसंती दर्शवत असतात.
अशातच मितालीने मकरसंक्रांती निमित्त खास फोटो शेअर केला आहे. मितालीने मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाची साधी साडी व त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज असा खास लूक असलेला फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. “तुम्हा सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असं म्हणत तिने हा खास फोटो शेअर केला. दरम्यान, तिच्या या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या मंगळसूत्राने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. मितालीच्या गळ्यातील मंगळसूत्र हे अगदी साध्या पद्धतीचे आहे. पण मंगळसूत्राच्या मुख्य दोन वाट्यांना डायमंडची खास डिझाईन आहे.
त्यामुळे साधे तरीही आकर्षक असे हे मितालीचे मंगळसूत्र चाहत्यांना विशेष आवडल्याचे कमेंट्सद्वारे सांगितले आहे. तसेच मितालीने शेअर केलेल्या फोटोमधील तिचा हा खास लूकही चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला आहे. नवरा व अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या फोटोवर खास इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनीही “खूप गोड, सुंदर, छान” अशा कमेंटसह मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.