Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात सतत भांडण होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता व विकी प्रत्येक गोष्टीवर वाद घालताना दिसले. अंकिताला विकीच्या वागण्यामुळे अडचणी येत असल्याचं चित्र दिसत आहे. भांडणादरम्यान अंकिताने रागातच सांगितले की, ती आता विकीच्या आयुष्यातून निघून जात आहे. याशिवाय अंकिताला विकी घरातील इतर मुलींसह फ्लर्ट किंवा मज्जा-मस्ती करताना आवडत नाही आहे. अंकिताने विकीला असं न करण्यास सांगितले आहे. तसंच तो अशा कृतींमधून स्त्रीवादी दिसत असल्याचंही तिने म्हटलं आहे. अंकिताने विकीला मर्यादा ओलांडू नकोस असंही सांगितले आहे.
विकी जैन बागेत बसून आयेशा व ईशासह बोलत असताना या भांडणाची सुरुवात झाली. यावेळी अंकिताही तिथे बसली होती. यादरम्यान आयशा व ईशा विक्कीबद्दल विनोद करतात जे अंकिताला आवडत नाही. अंकिता विकीला विचारते की, “तू हे सर्व का होऊ देत आहेस. अशा गोष्टी तू थांबवायला हव्यात. या सर्व गोष्टींवरुन तुम्ही स्त्रीवादी आहेस असं दिसतंय. तू लोकांशी फ्लर्ट करत आहेस. तू प्रत्येक गोष्ट विनोद म्हणून घेत आहेस. तुझी नसलेली इमेज तू तयार नको करू” असं ती विकीला म्हणते.
यावर विकी त्याच स्पष्टीकरण देत असं म्हणतो की, “तूच असं म्हणत आहेस, म्हणून हे असं चाललं आहे नाहीतर मला वाटत नाही असं काही होईल. त्यानंतर विकी जैन झोपलेला असतो. तेव्हा आयेशा मजेशीर वेशभूषा करुन विकीकडे जाते. तेव्हा ईशा व अंकिता एकत्र असतात. आयेशा स्वत:ला बाहुली म्हणत विकीला ओळख करुन देते. यानंतर विकी आयेशाला विचारतो, “मी झोपलेला कसा दिसत आहे?” हे ऐकून अंकिताला राग येतो.
अंकिता म्हणते, “तुला फक्त अश्लील बोलायचे आहे का? गंमतीत असलं तरी ते चांगलं दिसत नाही”. पुढे, अंकिता विकीला समजावते की, “जर मी एखाद्या मुलाला विचारले की मी झोपलेली कशी दिसत आहे, तर हे ऐकायला कसे वाटेल? हे योग्य नाही” असंही ती म्हणते.