Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोमधील स्पर्धकही त्यांच्या खेळामुळे, त्यांच्यातील भांडणामुळे चर्चेत आले आहेत. जसजसा या शोचा फिनाले जवळ येत आहे तसतशी या शोची रंगत वाढत चालली आहे. अशातच विकेंडच्या वारला घरातून एक सदस्य बेघर झाला आहे. ‘बिग बॉस’ स्पर्धक समर्थ जुरेलचा शोमधील प्रवास संपला असल्याचं समोर आलं आहे. नामांकित स्पर्धकांमध्ये, ‘बिग बॉस’च्या घरातील समर्थचा प्रवास संपला कारण त्याला प्रेक्षकांची सर्वात कमी मते मिळाली.
‘बिग बॉस’ने नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचे नाव सांगताच ईशा मालवीयला अश्रू अनावर झाले, तर अभिषेक कुमारने समर्थ घरातून बाहेर पडताना त्याची माफी मागितली. त्याच्या नावाची घोषणा ऐकून इतर स्पर्धकांनाही धक्का बसला. समर्थ बाहेर पडत असताना त्याने अभिषेकला मिठी मारली आणि नंतर त्याला ‘सॉरी’ असंही म्हणाला. घरातून बाहेर जात असताना त्याने पुन्हा एकदा अभिषेकची माफी मागितलेली पाहायला मिळाली.
समर्थ जुरेलने त्याच्या नृत्याने सर्वांचे मनोरंजन केले. ‘बिग बॉस’च्या घरात भारती सिंग व हर्ष लिंबाचिया पाहुणे मंडळी म्हणून आले होते. तेव्हादेखील त्यांनी समर्थला पोल डान्स करायला सांगितला. दरम्यान, अभिषेक कुमारचा पोल म्हणून वापर करण्यास सांगितला आणि दोघांनी उत्कृष्ट कामगिरी करत डान्स केला. ‘बिग बॉस’चा हा विकेंडच्या वार लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला. यावेळी करणने घरातील काही सदस्यांना खडसावलं. ईशा, मुनव्वर, आयशा, विक्की यांना चांगलंच फटकारलं.
काही आठवड्यांपूर्वी समर्थ, ईशा व अभिषेक यांच्यात घरात वाद झाला होता. या भांडणात रागाच्या भरात अभिषेकने समर्थच्या कानशिलात लगावली होती. अभिषेकला भडकवल्याबद्दल सलमान खानने समर्थवर टीका केली आणि समर्थला थप्पड मारल्यानंतर बाहेरच्या जगात अभिषेक हिरो बनल्याचा उल्लेख केला.