सध्या देशभरात सर्वत्र रामजन्मभूमी अयोध्याच्या उद्घाटन सोहळ्याचा माहोल पहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. पण त्याच्या विधींना १६ जानेवारी म्हणजेच आजपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, या खास कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल व सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया हे दोघेही अयोध्या शहरात पोहोचले आहेत. (Arun Govil At Ayodhya)
यावेळी अयोध्येत पोहोचताच लोकांनी त्यांच्याभोवती लोकं जमा झाली आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांना नमस्कार केला. अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते विमानामध्ये बसलेले दिसत आहेत आणि सर्वत्र ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जात आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “राम नाम कर अमित प्रभाव, संत पुराण उपनिषद गवा. आज अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर विमान उतरल्यानंतरची काही दृश्ये… खूप सुंदर विमानतळ आहे. जय श्री राम.”
राम नाम कर अमित प्रभावा,
— Arun Govil (@arungovil12) January 13, 2024
संत पुरान उपनिषद गावा।
आज विमान द्वारा अयोध्या जी के महर्षि वाल्मीकि हवाई अड्डे पर उतरने के उपरांत के कुछ दृश्य… बहुत ही सुंदर एयरपोर्ट है
जय श्रीराम ???????? pic.twitter.com/7IdT99uHPD
अरुण गोविल विमानतळावर उतरताच त्यांचे अनेक चाहते त्यांच्याभोवती जमा झाले. त्यांच्याबरोबर फोटो व व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली आणि ‘जय श्री राम’ म्हणत त्यांना शुभेच्छाही दिल्या. ‘जय श्री राम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा अनेक घोषणा देत चाहत्यांनी अरुण गोविल यांचे विमानतळावर स्वागत केलेया स्वागतावेळी त्यांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार घालण्यात आला तसेच त्यांना भगवी शालही देण्यात आली.
दरम्यान, अरुण गोविल यांना विमानतळावर पाहताच त्यांचे अनेक चाहते भारावलेले पाहायला मिळाले. त्यांना विमानतळावर पाहताच अनेकांनी “आम्ही तुम्हाला याआधी टीव्हीवर पाहिले होते आणि आज प्रत्यक्ष पाहिल्यावर खूप छान वाटले.” अशी प्रतिक्रियाही दिली. तर अरुण गोविल यांनी शेअर केलेल्या खास व्हिडीओवर त्यांच्या एका चाहत्याने “राम पुष्पक विमानात बसून अयोध्येला पोहोचला आहे.” असे म्हटले आहे तर आणखी एकाने “आजही लोकांना तुमच्यात श्रीरामाची प्रतिमा दिसते. राम या नावाने मनात येणारा पहिला चेहरा तुमचाच आहे.” असे म्हटले आहे.