शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खास डेकोरेशन, पारंपरिक लूक अन्…; पाठकबाई-राणादाचं पहिल्या मकरसंक्रांतीचं सेलिब्रेशन ठरलं लक्षवेधी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 16, 2024 | 1:53 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Akshaya deodhar and hardik joshi makar sankrant special look photos viral on social media

खास डेकोरेशन, पारंपरिक लूक अन्...; पाठकबाई-राणादाचं पहिल्या मकरसंक्रांतीचं सेलिब्रेशन ठरलं लक्षवेधी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी. या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या या जोडीने खऱ्या आयुष्यातदेखील एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर हे दोघेही त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. नुकताच काल (१५ जानेवारी) रोजी देशभरात सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्यांच्या या पहिल्या मकरसंक्रांतीनिमित्त त्यांनी खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळालं. (Akshaya Deodhar And Hardik Joshi On Instagram)

हार्दिक व अक्षया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. दोघेही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज मकरसंक्रांत आहे आणि लग्नानंतर ही अक्षयाची पहिलीच संक्रांत आहे. त्यानिमित्त तिने तिच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षया हार्दिकला तिळगूळ खायला देतानाचा खास क्षणदेखील टिपला गेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हेही वाचा – Video : “आपल्या छोट्याश्या मदतीनेही…” ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमची मदत करायलाही…”

या खास फोटोमध्ये अक्षयाने काळ्या रंगाची काठा पदराची साडी परिधान केली आहे. काळ्या रंगाच्या या साडीला सोनेरी व मेहेंदीच्या रंगाचा मोठा काठदेखील आहे. अक्षयाने परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर तिने गळ्यात घातलेले हलव्यांचे आकर्षक दागिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच तिने नाकात सुंदर नथदेखील घातली आहे. तर हार्दिकनेदेखील काळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर सोनेरी रंगाचा काठ असलेला धोतर परिधान केला आहे. त्याचबरोबर त्याने गळयात हलव्याच्या दागिन्यांचा डिझाइनर हार घातला आहे.

हेही वाचा – बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रण, ‘हे’ पाहुणेदेखील राहणार उपस्थित

दरम्यान, अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहते तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पाठकबाई-राणादा खूपच सुंदर’, ‘पाठकबाई छान दिसत आहात’, ‘तुमची साडी खूप सुंदर आहे’, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच हार्दिक होस्ट करत असलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्येही अक्षयाने संक्रांतीनिमित्त हजेरी लावली होती. यावेळीदेखील हार्दिक व अक्षया या दोघांनी संक्रांतीचा खास लूक केल्याचे पाहायला मिळाले होते.

Tags: अक्षया देवधरमनोरंजन बातमीमकरसंक्रांतमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी कलाकारमराठी बातमीहार्दिक जोशीakshaya deodharentertainment newsHardik JoshiMakar Sankrantmarathi actormarathi actressMarathi artistmarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"मी झोपलेला…", आयेशा खानला पाहून विकी जैनचं अश्लील बोलणं, अंकिता लोखंडे भडकली, म्हणाली, "तुला फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.