शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रण, ‘हे’ पाहुणेदेखील राहणार उपस्थित

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 16, 2024 | 12:39 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor ayushmann khurrana invited for ram mandi pran pratishtha ceremony in ayodhya

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रण, ‘हे' पाहुणेदेखील राहणार उपस्थित

रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. देशातील प्रत्येक जण राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत दाखल होणार आहे. यात सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड, साऊथ आणि मराठी कलाकारांनाही या समारंभाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. (Ayushmann Khurrana Invited For Ram Mandi Pran Pratishtha)

अनेक बॉलिवूड कलाकारांनाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अयोध्येतील राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणि तो अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

हेही वाचा – Video : “आपल्या छोट्याश्या मदतीनेही…” ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थक्क् करणारा प्रसंग, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमची मदत करायलाही…”

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभास उपस्थित राहण्यासाठी आयुष्मान खुरानाला आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संपर्क प्रमुख, सीए अजित पेंडसे यांनी वैयक्तिकरित्या आयुष्मानला या समारंभाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आयुष्मानच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…”

दरम्यान, अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी म्हणजेच १६ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राम मंदिर २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती दिली आहे.

Tags: ayushmann khurranabollywood actorBollywood entertainmentBollywood Entertainment News आयुष्मान खुरानाbollywood newsbollywood singerentertainment newsबॉलिवूड मनोरंजनबॉलीवूड अभिनेताबॉलीवूड गायकबॉलीवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade

हलव्याचे दागिने, पारंपरिक कपडे अन्…; अमृता देशमुख व प्रसाद जवादेने थाटामाटात साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.