शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shilpa Tulaskar Answers To Trollers

मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…"

सध्या मराठी कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा मोर्चा इतर भाषांमध्ये वळवला आहे. मराठीसह ही कलाकार मंडळी हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रमलेले दिसत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा नुकताच एक तेलुगू भाषेतील चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा तुळसकर. (Shilpa Tulaskar Answers To Trollers)

शिल्पाने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकतीच ती ‘हाय नन्ना’ या तेलुगू चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेच ही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन ‘हाय पापा’ यामध्येही ती होती. या चित्रपटात तिने मृणाल ठाकूरच्या आईची भूमिका साकारली होती. शिल्पाने तिच्या फेसबुकवर मृणाल ठाकूरबरोबरचा एक फोटो शेअर केला. हा फोटो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं कळत आहे. फोटोसह शिल्पाने मृणालसाठी लिहिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली ऐश्वर्या राय, संपत्ती ऐकून व्हाल थक्क, अनुष्का-प्रियांकालाही टाकलं मागे अन्…

मृणालबरोबरचा फोटो शेअर करत “तू खूप खास आहेस, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना सोशल मीडियावर शेअर करणं अशक्य. मी तुला कधीच कोणाशीही शेअर करणार नाही. पण एक कलाकार म्हणून तू किती बहरली आहे, हे सर्वांना कळावं अशी माझी इच्छा आहे. तुझा परफॉर्मन्स सहज वाटतो, पण त्यामागची मेहनत मी पाहिली आहे. हे सर्व करताना मी त्या खोडकर मुलीला भेटले, जिला मी काही वर्षांपूर्वी भेटले होते आणि मी पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडले. मृणाल ठाकूर तुला जे हवं ते सगळं मिळो,” असं कॅप्शन शिल्पाने दिलं आहे.

आणखी वाचा – “किती निर्लज्जपणे…”, सिगारेट ओढत काढलेल्या फोटोमुळे आमिर खानची लेक ट्रोल, नेटकरी म्हणाले, म्हणाले, “काय गरज…”

शिल्पाने सदर पोस्ट इंग्रजीमध्ये केली आहे. यावरुन एका नेटकऱ्याने केलेली कमेंट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोखाली कमेंटमध्ये एका युजरने “केव्हातरी मराठीत पण व्यक्त हो अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटला उत्तर देत शिल्पा म्हणाली, “मी कलाकार आहे, महाराष्ट्राची असल्याचा सार्थ अभिमान आहे पण माझे प्रेक्षक फक्त मराठी नाहीत. महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे, पण मराठी किंवा महाराष्ट्राची या ओळखीपुरती मी स्वत:ला मर्यादित ठेऊ इच्छित नाही. त्यापल्याडच्या चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला मिळाला आहे” असं म्हणत तिने नेटकऱ्याची बोलती बंद केली आहे.

Tags: entertainmentmarathi actressshilpa tulaskarshilpa tulaskar answers to trollersshilpa tulaskar telugu movieshilpa tulaskar troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg boss marathi fame actor utkarsh shinde saved the puppys life video shared on instagram

Video : “आपल्या छोट्याश्या मदतीनेही...” ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमची मदत करायलाही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.