गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “आपल्या छोट्याश्या मदतीनेही…” ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमची मदत करायलाही…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 16, 2024 | 11:53 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss marathi fame actor utkarsh shinde saved the puppys life video shared on instagram

“आपल्या छोट्याश्या मदतीनेही...” ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमची मदत करायलाही...”

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत पोहोचलेला गायक, गीतकार, संगीतकार व अभिनेता म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीमुळे सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. उत्कर्ष हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो व कामाबद्दलची काहीही अपडेट तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याचबरोबर तो समाजभानही जपतो. अशीच एक समाजभान जपणारी गोष्ट उत्कर्षबरोबर घडली आणि ही गोष्ट त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

उत्कर्षने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओमध्ये उत्कर्षने एका कुत्राच्या पिल्लाचा जीव वाचवला असल्याचे दिसत  आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने एक पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “फायटर’वर संक्रांत आली होती का? माहिती नाही पण ‘संकट’ नक्कीच आलं होतं…छत्रपती संभाजी नगरमध्ये सामाजिक रित्या माझा वाढदिवस साजरा करून भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. हायवेवर एका मागोमाग भरधाव वेगाने वाहने धावत होती आणि तितक्यात नगर येता येता रस्त्याच्या मधोमध दिसला एक चिमुकला ‘फायटर’. एका पायाने लंगडत हायवेवर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जीवाच्या आकांताने मधोमध पळणार, घाबरलेलं, वाट विसरलेलं एक चिमुकलं कुत्र्याचं पिल्लू. आमच्या गाडीसमोर ‘फायटर’ दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये याची भीती होती. तसाच मी गाडीतून उतरुन हायवेवर धावत रस्त्याच्या मधोमध ‘फायटर’च्या मदतीस पोहोचलो, त्याला उचललं. पाहिलं तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला याची आई जवळ आसपास असेल. याला इथेच झाडात सोडू म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेनं बघू लागलं.”

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

हेही वाचा – मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं. गाडीत आमच्याबरोबर घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाहीना? हे पाहिलं. तो भूकेला असेल, तहान लागली असेल, आधी याला एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल या विचाराने त्या पिल्ला घेऊन पुढे एका धाब्यावर थांबलो, त्याला पाणी पाजलं-बिस्कीट खाऊ घातलं. त्याच्या पायाला औषध लावलं आणि काही काळ आम्ही गुळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतले. काहींनी त्या पिल्लाबद्दल विचारपूस केली. मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने “मी हे पिल्लू घेऊ का? मी त्याचा सांभाळ करतो सर” म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली आणि मनात विचार आला. आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी. आजच्या या संकटाला हरवून एका ‘फायटर’सारखा”

हेही वाचा – “किती निर्लज्जपणे…”, सिगारेट ओढत काढलेल्या फोटोमुळे आमिर खानची लेक ट्रोल, नेटकरी म्हणाले, म्हणाले, “काय गरज…”

“आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की, आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. तुम्ही कोणाची तरी मदत केली तर तुमची मदत करायलाही कोणीना कोणी नक्कीच येईल. आज तिळगुळ देऊन फक्त वरून गोड गोड बोलायचं नाही तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा,” असं उत्कर्षनं लिहिल आहे. दरम्यान, उत्कर्षच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओखाली “आज तुमच्यामुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला, खुप छान, ग्रेट वर्क, आज ते पिल्लू तुमच्यामुळे वाचलं दादा, हे काम करुन तू सर्वांची मनं जिंकलीस दादा” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी उत्कर्षचे कौतुक केले आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी गायकमराठी अभिनेतामराठी मनोरंजनमराठी बातमीबिग बॉस मराठी फेमbigg boss marathi fameentertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi Entertainment News उत्कर्ष शिंदेMarathi newsmarathi singerutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

अंकिता लोखंडे व विकी जैनमध्ये जोरदार भांडण, आयेशा खानला नवऱ्याच्या अंगावर ढकललं अन्…; म्हणाली, “सर्वकाही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.