शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘तू चाल पुढं’ला निरोप देताना दिपा परबला रडू कोसळलं, हातात गणपतीची मुर्ती घेतली अन्…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भावुक

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
tu chal pudha fame actress deepa chaudhari got emotional on last day of serial video shared social media

Video : 'तू चाल पुढं'ला निरोप देताना दिपा परबला रडू कोसळलं, हातात गणपतीची मुर्ती घेतली अन्...; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भावुक

मराठी मनोरंजन विश्वात टीव्हीवरील मालिकांचे एक वेगळेच महत्त्व आहे. घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीला मालिका या त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग वाटत असतात आणि जेव्हा या मालिका बंद होतात तेव्हा कलाकारांइतकंच प्रेक्षकांनाही वाईट वाटतं. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १३ जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. अल्पवधीतच मालिका व मालिकेतील कलाकार चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले.  

‘तू चाल पुढं’ मालिकेतील काही कलाकारांनी त्यांचे सेटवरील शेवटचे व्हिडिओ व फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले. अभिनेत्री धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. नुकतीच अभिनेता आदित्य वैद्यनेदेखील एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे आणि यानंतर आता अभिनेत्री दीपा परबनेदेखील तिचा एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्याबरोबर एक खास वस्तूदेखील आठवण म्हणून नेली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

आणखी वाचा – “त्या मुद्दाम…”, जया बच्चन कॅमेऱ्यासमोर सतत भडकण्यावरुन नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “फोटोग्राफर्सवर चिडल्यानंतर…”

दीपाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अश्विनी तिच्या नव्या घरात प्रवेश करत आहे. तर मालिकेचे दिग्दर्शक शेवटचा कट म्हणत सगळ्यांना निरोप देत आहेत. यानंतर सगळेच कलाकार भावुक होत एकमेकांना निरोप देत आहेत. यानंतर दिपा सेटवरील सगळ्यांची भेट घेते आणि त्याचबरोबर सर्वांच्या पायादेखील पडते. यानंतर ती सेटवरील एक गोष्ट आपल्याबरोबर घेऊन जाते. ही गोष्ट आहे अश्विनीचा लाडका गणू. “अश्विनीची नवीन घराची स्वप्नपूर्ती आणि दीपाचा यापुढील प्रवास या दोन्हीचा साक्षीदार राहील हा गणू!” असं म्हणत ती आठवण म्हणून त्याला आपल्याबरोबर घेऊन गेली आहे.  

आणखी वाचा – “परिस्थिती अवघड झाल्यावर…”, आर्यन खान प्रकरणावर पहिल्यांदाच बोलला शाहरुख खान, म्हणाला, “सगळं चांगलं सुरु असताना…”

दरम्यान, या भावुक व्हिडीओवर चाहत्यांनीदेखील कमेंट्स करत मालिका संपत असल्यावर दु:ख व नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “मालिका संपते तेव्हा आम्हा प्रेक्षक वर्गाला पण कुठे तरी वाईट वाटते. आम्ही कलाकारांना आपल्या घरातील सदस्य मानत असतो. तुम्ही व तुमची मालिका कायम स्मरणात राहील. तर आणखी एकाने असे म्हटले आहे की, “मालिकेची संकल्पना खूपच छान होती. खूप आवडती मालिका निरोप घेत आहे. याचं दु:ख वाटतं आहे.” अशा अनेक कमेंट्सद्वारे मालिकेच्या चाहत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे.

Tags: deepa chaudharientertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialtu chal puddaतू चाल पुढंदीपा परब चौधरीमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Alia Bhatt And Neetu Kapoor

आलिया भट्ट व नीतू कपूर यांच्यातही होतात वाद, अभिनेत्रीच्या सासूचा खुलासा, म्हणाल्या, "तिच्या आईबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.