करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ८’ हा लोकप्रिय शो सध्या साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विविध कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावत अनेक खुलासे करताना दिसत आहेत. त्यामुळे हा शो पाहणं प्रेक्षकांनाही रंजक ठरतं आहे. अशातच या शोच्या पुढील भागात नीतू कपूर व झीनत अमान या बॉलीवूडच्या दोन ज्येष्ठ अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. यावेळी कार्यक्रमात नीतू कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरेच भाष्य केलं आहे. (Alia Bhatt And Neetu Kapoor)
नीतू कपूर यांनी आलिया व त्यांच्यात होणाऱ्या भांडणामागचे कारण सांगत भाष्य केलं. तसेच त्यांनी त्यांची नात राहाबद्दलही भाष्य केलेलं पाहायला मिळालं. आलिया व त्यांच्यात होणाऱ्या भांडणांबद्दल भाष्य करताना त्या म्हणाल्या, “राहामुळे माझ्या व आलियामध्ये भांडण होतात. एवढचं नाही तर आलियाची आई सोनी राजदान यांच्याबरोबरही भांडणं होतात. नीतू कपूर म्हणाल्या मी राहाला बाबा म्हणायला शिकवत आहेत तर आलियाची आई सोनी राजदान राहाला आई म्हणायला शिकवत आहे. एक दिवस आलिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली राहाने मम्मा म्हणून हाक मारली. यावर मी म्हणाले राहाच्या तोंडून मम्मा नाही मम-मम हा शब्द बाहेर पडला आहे. तू एवढी खूश होऊ नकोस.”
राहा नाना नाही तर दादा म्हणत असल्याचेही नीतू कपूर म्हणाल्या. आलिया व रणबीरने आपल्या मुलीचे नाव राहा का ठेवले याबाबत नीतू कपूर यांनी खुलासा करत म्हटलं की, “जेव्हा जेव्हा मी माझ्या नातीला बघते तेव्हा मला आतून खूप शांत वाटते. तिचा चेहरा हसरा व प्रसन्न आहे. राहा हे नाव तिच्यासाठी अगदी योग्य आहे” असंही त्या म्हणाल्या.
अलीकडेच झालेल्या नाताळचं औचित्य साधत तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच गेल्या वर्षीच्या ख्रिसमसच्या दिवशी आलिया व रणबीरने राहाचा चेहरा पहिल्यांदा मीडियासमोर दाखवला होता. तेव्हापासून राहाचं सर्वत्र कौतुक होताना दिसलं.