मनोरंजनात विश्वात सध्या पापाराझींचे चांगलेच पेव फुटले आहे. सेलिब्रिटी अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर हसताना आणि पोज देताना दिसतात. पापाराझीच्या कॅमेऱ्यात दररोज अनेक सेलिब्रिटी कैद होतात. काही सेलिब्रिटी या पापाराझींना पोज देत फोटो काढतात. काही सेलिब्रिटी या पापाराझींना फोटोसाठी सहकार्य करतात. मात्र, जया बच्चन याला अपवाद आहेत. जया बच्चन पापाराझींसमोर येते तेव्हा त्या अनेकदा पापाराझींवर वैतागलेल्या दिसतात. पण जया बच्चन यांच्या पापाराझींवरच्या संतापाला उत्तर देण्याच्या स्वभावावर नीतू कपूर यांनी आता काही वेगळेच सांगितले आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्या पापाराझींबरोबरच्या नात्याबद्दल म्हटले आहे. जया बच्चन अनेकदा पापाराझींवर रागावताना दिसतात. मात्र नीतू यांनी जया बच्चन यांच्या या वागण्याला चुकीचे म्हटले आहे. यावेळी नीतू असं म्हणल्या की. “मला असे वाटते की त्या हे असं मुद्दाम करतात. इतकेच नाही तर जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात चांगलेच संगनमत आहे. जया बच्चन या पापाराझींवर चिडल्याचे क्वचितच झालं असेल. पण त्या प्रत्यक्षात अजिबात अजिबातच तशा नाहीत. त्या खूपच चांगल्या आहेत.”
यापुढे करणने जोहरनेही असे म्हटले की, “जया बच्चन खूप गोड आहेत. त्या पापाराझींसमोर येतात आणि ‘बस्स झालं’ असं म्हणतात. त्यामुळे पापाराझींदेखील त्यांना अधिक घाबरतात. मला वाटतं तेही आता एन्जॉय करतात. याचा सगळेजण आनंद घेतात.”
जया बच्चन या अनेकदा पापाराझींना फटकारताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही होते. तर काही जण जया बच्चन यांचा हा मूळ स्वभाव असल्याचेही म्हणतात. दरम्यान, नुकतीच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात जया यांनी अत्यंत रागावलेल्या आईची भूमिका साकारली होती.