छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाची थीम ही जोडप्यांवर आधारित होती. या शोमधील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चांगलीच गाजली. अशातच येत्या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. कलर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले असून यावेळी अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी त्याचबरोबर भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले.(Rashami Desai Supported Ankita Lokhande)
या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्याचे शूटिंग पार पडले असून अंकिता व विकीच्या आई या शोमधून परतल्या आहेत. दरम्यान, विकीची आई रंजना जैन यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. ज्याद्वारे त्यांनी अंकितावर निशाणा साधला आहे. रंजना जैन यांनी अंकिताबद्दलच्या केलेल्या अनेक व्यक्तव्यांमुळे सोशल मीडियावर त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अशातच अंकिताची मैत्रीण व टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने अंकिताच्या समर्थनार्थ एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “स्वतःच्या प्रगतीकडे…”
रश्मी देसाईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अंकिताबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर अभिनेत्रीने अंकितावर प्रेमाचा वर्षाव करत असे म्हटले आहे की, “तू जशी आहेस तशीच राहा आणि तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. तू स्वतःमध्ये खूप बदल केले आहेस आणि हे बदल तू फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या प्रेमासाठी केले आहेस. तु ज्याच्यावर प्रेम करतेस त्याच्यासाठी केले आहेस. आजवर तू जे जे कमावले आहेस ते फक्त तुझ्या मेहनतीने कमावले आहेस. तू तुझा बिनधास्त व बेधडक स्वभाव नेहमीच जपला पाहिजेस.”
आणखी वाचा – येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहता येणार ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी
यापुढे रश्मीने अंकिताच्या सासूबद्दल असे म्हटले की, “मला माहित आहे काकी (अंकीताची सासू) तुम्हाला कदाचित वाईट वाटेल. पण ते दोघे माझे चांगले मित्र आहेत आणि ते ‘बिग बॉस’चा एक भाग आहेत. तुम्ही नाही. त्यामुळे कृपया बाहेर येऊन तुम्ही वेगळा ‘बिग बॉस’ खेळू नका. अजून खूप आयुष्य बाकी आहे.” दरम्यान, अंकिताच्या सासूने तिच्यावर केलेल्या आरोपांमुळे विकी जैनच्या आईवर अनेक माध्यमांधून प्रतिक्रिया येत आहेत.