२०२४ या नवीन वर्षाची सुरुवात झाली असून हे नवीन वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनेदेखील अधिकच सकस आहे. येत्या नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठडव्यात ओटीटीवर अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रदर्शित झाले. त्यांतर आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक उत्तमोत्तम चित्रपट व वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसीरिज आणि चित्रपट पाहता येतील. तर जाणून घ्या ही संपूर्ण यादी…
(१) किलर सूप : मनोज बाजपेयी व कोंकणा सेन शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेली क्राइम थ्रिलर वेबसिरीज ‘किलर सूप’ येत्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजची कथा प्रभाकर (मनोज बाजपेयी) आणि स्वाती (कोंकणा सेन शर्मा) यांची असल्याचे बोलले जात आहे. उमेश आणि स्वाती यांचे एकमेकांवर प्रेम आहे. स्वातीचे शेफ बनण्याचे स्वप्न आहे. पण एका हत्येनंतर यांचे आयुष्यच बदलून जाते. अभिषेक चौबे दिग्दर्शित ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(२) एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन : हा चित्रपट १२ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात अभि नावाची व्यक्ती आहे ज्याला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे आणि तो जेव्हा मोठा होतो, तेव्हा तो एक कनिष्ठ कलाकार बनतो. पण जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिथाच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याच्या रील आणि वास्तविक जीवनाला एक विचित्र वळण मिळते. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत.
(३) इको : इको सीरिजची कथा ही माया या पात्राभोवती फिरणारी आहे. जी तिच्या घरी परतते आणि तिच्या लोकांबरोबर नवीन नाते निर्माण करते. या सीरिजमध्ये अलक्वा कॉक्स ही अभिनेत्री मायाची भूमिका साकारत आहे. मायाच्या जन्मगावी जे काही घडलं त्याचा संदर्भ आपल्याला या सीरिजमधून पहायला मिळणार आहे. ११ जानेवारीला ‘डिझ्नी प्लस हॉटस्टार’वर ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे.
(४) मिशन इम्पॉसिबल ७ : ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या ७व्या भागात इथन हंटची भूमिका अभिनेता टॉम क्रूझने केली आहे. जो पुन्हा एकदा आपल्या नव्या मिशनवर निघाला आहे. ही सीरिज येत्या ११ जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मिशन इम्पॉसिबलच्या आधीच्याही सीरीजलाही चाहत्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता.
(५) द लीजेंड ऑफ हनुमान ३ : ही सीरिज भगवान हनुमानाच्या कथेवर आधारित आहे, ज्यात सीतेला वाचवण्यासाठी हनुमान रामाला कशी मदत करतात हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजच्या दोन सीजननंतर या सीरिजचा आता तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द लीजेंड ऑफ हनुमान’चा तिसरा सीझन हा येत्या १२ जानेवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.