शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या लग्नाची तारीख…”, शिवानी सुर्वेबरोबर लग्ना करण्याबाबत पहिल्यांदाच बोलला अजिंक्य ननावरे, म्हणाला, “आनंदाची बातमी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
satvya mulichi satavi mulgi fame actor ajinkya nanaware talked about his marriage with shivani surve see the details

"आमच्या लग्नाची तारीख...", शिवानी सुर्वेबरोबर लग्ना करण्याबाबत पहिल्यांदाच बोलला अजिंक्य ननावरे, म्हणाला, "आनंदाची बातमी..."

सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२३ या वर्षात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. आमिर खानची लेक आयरा खानदेखील बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर नुकतीच विवाहबंधनात अडकली. गेल्याच महिन्यात प्रथमेश-मुग्धा, स्वानंद-गौतमी, स्वानंदी-आशिष, सोनल-समीर, सुरुची-पियुष या लोकप्रिय मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता मराठीतील आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे. (Ajinkya Nanaware Talk On His Marriage)

गेल्या अनेक वर्षांपासून शिवानी व अजिंक्य हे दोघे रिलेनशिपमध्ये आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता येत्या नवीन वर्षात हे दोघे विवाहबांधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवानी व अजिंक्य यांनी अनेकदा त्यांचे एकमेकांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. नुकताच शिवानीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयीचा खुलासा केला होता. तर अजिंक्यनेही  नुकत्याच शेअर एका केलेल्या फोटोवरील कॅप्शनमुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली असल्याचे म्हटले जात आहे. अशातच अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाविषयी भाष्य केले आहे.

आणखी वाचा – Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

अभिनेता अजिंक्य ननावारेने नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत लवकरच त्यांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्याला येत्या नवीन वर्षात तु लग्नबंधनात अडकणार आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उत्तर देत अजिंक्यने असे म्हटले की, “लवकरच आम्ही आमच्या लग्नाची तारीख जाहीर करणार आहोत. येत्या नवीन वर्षात आम्ही सर्वांबरोबर  एक आनंदाची बातमी शेअर करणार आहोत. ही तारीख आम्ही व्यवस्थितपणे नियोजन करुन अधिकृतपणे जाहीर करणार आहोत.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन लेकींसह विमान अपघातात धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना, फिरायला गेला होता अन्…

दरम्यान, अजिंक्य हा सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याची ही भूमिका चाहत्यांन खूपच आवडते. तर झिम्मा २ या चित्रपटामधील शिवानी सुर्वेही भूमिकादेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अशातच ही जोडी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

Tags: ajinkya nanawareentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsshivani surveअजिंक्य ननावरेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनशिवानी सुर्वे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
actress shilpa navalkar shared bts video of tharla tar mag serial on Instagram

Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच येणार नवं वळण?, अभिनेत्रीचा आगीबरोबर शूट करतानाचा थरारक BTS व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.