शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2023 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bollywood actor aamir khan daughter ira khan and nupur shikhare pre wedding function started kiran rao spotted

मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी

कलाविश्वात सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. बॉलिवूड अभिनेता आमीर खानची लेकही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. इराने तिच्या सोशल मीडियाद्वारे या विधींचे काही खास क्षण शेअर केले आहेत. (Ira Khan Pre Wedding Rituals)

इराच्या केळवणाला सुरुवात झाली असून तिच्या केळवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले असल्याचे दिसत आहे. इराच्या या खास केळवणासाठी मोदक, लाडू, भरलं वांगं, पापड, लोणचं असा खास बेत आखण्यात आला होता. आणि केळीच्या पानावर हा पंचपक्वानाचा बेत करण्यात आला होता. मंगळवारी रात्री या खास केळवणाचे आयोजन करण्यात आले होते. स्वत: इराने याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी त्याला ओळखते तो…”, विकी जैनने अंकिता लोखंडेवर हात उचलल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “तो माझ्याबरोबर…”

इराने तिच्या मित्रांबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. यावेळी इराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर  नुपूरनेही तिच्या साडीला साजेसा लाल रंगाचा कुर्ता, काळ्या रंगाचा धोतर, सोनेरी रंगाचा जॅकेट व त्यावर महाराष्ट्रीयन अंदाजातला फेटादेखील परिधान केला होता. इरा व नुपूरच्या या खास सोहळ्यात आमिर खानची पहिली पत्नी किरण राव व मुलगा आझाद हेदेखील उपस्थित होते.

आणखी वाचा –  “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…

दरम्यान, इरा खान व नूपुर शिखरे यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला आणि आता येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

Tags: aamir khanbollywood newsdaughter ira khanentertainment newsira khanira khan and nupur shikhare second Kelvan functionsira khan pre-wedding ceremonies
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Salim Khan On Arbaaz Wedding

"चर्चा करण्याची गरज नाही कारण…", अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "ते पाप नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.