कलाविश्वात सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. बॉलिवूड अभिनेता आमीर खानची लेकही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. इराने तिच्या सोशल मीडियाद्वारे या विधींचे काही खास क्षण शेअर केले आहेत. (Ira Khan Pre Wedding Rituals)
इराच्या केळवणाला सुरुवात झाली असून तिच्या केळवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले असल्याचे दिसत आहे. इराच्या या खास केळवणासाठी मोदक, लाडू, भरलं वांगं, पापड, लोणचं असा खास बेत आखण्यात आला होता. आणि केळीच्या पानावर हा पंचपक्वानाचा बेत करण्यात आला होता. मंगळवारी रात्री या खास केळवणाचे आयोजन करण्यात आले होते. स्वत: इराने याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इराने तिच्या मित्रांबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. यावेळी इराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर नुपूरनेही तिच्या साडीला साजेसा लाल रंगाचा कुर्ता, काळ्या रंगाचा धोतर, सोनेरी रंगाचा जॅकेट व त्यावर महाराष्ट्रीयन अंदाजातला फेटादेखील परिधान केला होता. इरा व नुपूरच्या या खास सोहळ्यात आमिर खानची पहिली पत्नी किरण राव व मुलगा आझाद हेदेखील उपस्थित होते.
आणखी वाचा – “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…
दरम्यान, इरा खान व नूपुर शिखरे यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला आणि आता येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.