आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना वेड लावणारी गायिका म्हणजे सावनी रवींद्र. मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा सहा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन सावनीने बहुभाषिक रसिकांची मनं जिंकली.तिची अनेक गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली, तसेच सावनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत ती तिच्या आयुष्यातील आंनदाचे क्षणही शेअर करते. नुकतंच तिने काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.(Savaniee Ravindra Shreya Ghoshal)
सावनी ही सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या गाण्यासोबत तिच्या कुटुंबाचे काही खास क्षण नेहमीच शेअर करताना दिसते. तसेच ती तिच्या आयुष्यातील काही आंनदाचे क्षण देखील चाहत्यांना सांगते, नुकतंच तिने गायिका श्रेया घोषालला भेटून आनंद व्यक्त केला आहे. आणि तिने तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्यात.सावनीने नुकतीच श्रेया घोषालची भेट घेतली आहे. दरम्यान सावनी रवींद्र भावुक झाली.श्रेया घोषाल गेली अनेक वर्ष गाणी गात तिच्या आवाजाने सर्वांनां मंत्रमुग्ध करते. याच श्रेया घोषालला भेटून मराठमोळी गायिका सावनी रवींद्रला अश्रू अनावर झाले.
म्हणून सावनी श्रेयाला भेटताच झाली भावूक(Savaniee Ravindra Shreya Ghoshal)
सावनीने सोशल मीडियावर काही फोटो शेयर केलेत. या फोटोत सावनी श्रेयाला मिठी मारून ढसाढसा रडताना दिसत आहे. श्रेया सावनीला सावरताना दिसतेय. या अनुभवाबद्दल सांगताना सावनीने लिहिलय.. मला काही बोलायची गरज आहे का? मला वाटतं फोटो शब्दांपेक्षा जास्त बोलके आहेत. तिला पाहताच मी अगदी थक्क झाले आणि मला कळायच्या आतच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा माझी मैत्रिण चैतालीने माझी तिच्याशी ओळख करून दिली.

तेव्हा श्रेया अत्यंत नम्र स्वरात म्हणाली “नक्कीच सावनी मी तुला ओळखते, तू जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलास तेव्हा मी तुला गुगल केले होते आणि तू पुरस्कार जिंकलेलं गाणंही मी शोधलं होतं! पण दुर्दैवाने ते सापडले नाही. कृपया ते गाणं लवकरच रिलीज कर. मला ऐकायचं आहे” किती गोड होतं तिचं बोलणं! धन्यवाद श्रेया घोषाल मॅडम मला आयुष्यभराचा अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल! तू माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होतीस आणि राहशील! अशा शब्दात सावनीने तिच्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्यात.एका पुरस्कार सोहळ्यात सावनी आणि श्रेया यांची भेट झाली. या पोस्टवरअनेक चाहत्यांनी कॉमेंट देखील केल्या आहेत.
====
हे देखील वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये श्रेया बुगडेने घेतली सागर कारंडेची जागा
====
६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनीला सन्मानित करण्यात आले.तिच्या बार्डो सिनेमातील रान पेटलं या गाण्यासाठी तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.तर यामुळे तिचे नेहमी सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत.