झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सर्वत्र हवा आहे. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात माहीर आहेत. तर प्रेक्षकही या कलाकारांना त्यांच्या विनोदी शैलीला डोक्यावर उचलून घेतात. या कार्यक्रमातून काही महिन्यांपूर्वी अभिनेता सागर कारंडे याने एक्झिट घेतली. त्यावेळी चाहत्यांमध्येही नाराजगी पाहायला मिळाली. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. याच कार्यक्रमातून सागरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (shreya bugde sagar karande)
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सागरने प्रेक्षकांना जितकं खळखळून हसवलं तितकंच कधी पोस्टमन काका बनून रडवलही आहे. सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीने सादर केलेल्या पत्रांनी हास्याच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास भाग पाडले. दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे कामही सागरनेच केले.
पहा श्रेया बुगडेचा हा व्हिडीओ – (shreya bugde sagar karande)
झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतलेली पहायला मिळत आहे. एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा, असं म्हणत झी मराठीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्राच्या रुपात कविता वाचताना श्रेया बुगडेला पाहणं रंजक दिसतंय. दरम्यान श्रेयाने खास पोस्टमनचा लुकदेखील केला आहे.(shreya bugde sagar karande)

पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतल्याने सागरचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. झी मराठीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, सागर कारंडे वाचत असलेलं पत्र मनाला भिडायचं, तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, कुठे आहेस सागर कारंडे?,
====
हे देखील वाचा – भलतीच डेरिंग! म्हणून अलका कुबल यांनी विहिरीत मारली उडी आणि रंजना यांचा खाल्लेला ओरडा…
====
तर आणखी एका युजरने म्हटलंय, सागर कारंडेने ‘चला हवा येऊ द्या’ का सोडलं?, श्रेया तुझ्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. श्रेयाची विनोदी शैली प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेच तर सागरच्या आवाजातील मनाला भिडणारी पत्र वाचून श्रेयाने सागर कारंडेची जणू जागाच घेतली आहे.(shreya bugde sagar karande)
‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून सागरने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकल. हे व्हिडीओ खालील कमेंटवरून स्पष्ट दिसतंय. पोस्ट केलेल्या व्हिडीओ खालील कमेंटवरून सागरने ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये परत यावे अशी इच्छा चाहत्यांनी दर्शिविली आहे.