महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक लाडका बालकलाकार ते यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्माता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात चढउतार आल्यानंतर सुद्धा त्याच जिद्दीने गरुडझेप घेत त्यांची स्वप्न पूर्ण केली. परंतु आयुष्य जगत असताना प्रत्येकाला कोणाच्या तरी साथीची गरज असते. कुटुंबासोबतच आपली कोणी तरी व्यक्ती आपल्या सुखा दुःखात सोबत असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. महेश कोठारे याचं त्यांच्या पत्नी नीलिमा देसाई यांच्या सोबत लव्ह विथ अरेंज असं लग्न झालं आहे. त्याची लव्ह स्टोरी सुद्धा तेवढीच खास आहे.(mahesh kothare love story)

नीलिमा आणि महेश कोठारे यांची भेट एका लग्न समारंभात झाली, त्यावेळेस नीलिमा यांनी महेश यांना पहिल्यांदाच पाहिलं आणि नवरा म्हणून हाच मुलगा पाहिजे. त्यानंतर नीलिमा यांच्या घरी महेश यांची चर्चा सुरु झाली. महेश यांचं सिनेमात काम करणं नीलम यांच्या वडिलांना खटकत होतं. परंतु महेश आणि नीलिमा यांच्या पित्यांचे एक जवळचे नातेवाईक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी नीलिमा यांच्या वडिलांना समजावलं की, जरी महेश यांनी बालपणी चित्रपटात काम केलं असलं तरी आता ते एक उत्तम वकील असून त्यांची प्रॅक्टिस सुद्धा सुरु आहे. त्यांच्या एका शब्दावर नीलिमा यांच्या वडिलांनी एका नव्या नात्याला परवानगी दिली.
पहा महेश कोठारे यांची लव्हस्टोरी (mahesh kothare love story)
तरी सुद्धा एक प्रश्न मागे उरलाच होता. महेश यांना नीलिमा यांच्याबद्दल कल्पना देखील न्हवती. महेश यांच्या पसंतीचे काय? याची कल्पना नीलिमा यांना कोणी तरी करून दिली होती. परंतु नीलिमा त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्या त्यांच्या वडिलांना बोलल्या की जर महेश यांनी मला नकार दिला तर तुम्ही बोलाल त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. महेश यांचा कोणत्याही प्रकारचा परिचय नसताना आयुष्यभराचा जोडीदार म्हणून हाच मुलगा हवा असं कोणतीही मुलगी कसं बोलू शकते याचं महेश यांना आजही कौतुक वाटतं. (mahesh kothare love story)
लग्नाच्या दृष्टिकोनातून महेश यांनी नीलिमा यांना पाहिलं आणि शेवटचं पाहिलं होतं. नीलिमा यांना महेश यांच्यात आवडण्यासारखी अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं सिनेमात काम करणं कारण नीलिमा यांना सुद्धा सिनेमाची फार आवड होती.
====
हे देखील वाचा – आता मराठी चित्रपटां बाबत शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा संकल्पनेत असणार स्वप्नील जोशी , महेश कोठारे, संजय जाधव यांच्यासह अनेक कलाकारांचा सहभाग
====
मुलगा आणि मुलीला बघण्याचा कार्यक्रम ठरला. आणि महेश यांनी घरातून निघतानाच बाबा आणि त्यांच्या आईला सांगितलं जर मला मुलगी नाही आवडली तर मी तिथून उठून निघून जाईनं. परंतु नीलिमा यांना बघताच महेश यांना नीलिमा आवडल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रम आटपत आला होता तरी महेश तिथेच बसून होते. यावरून त्यांचे आई बाबा यांना महेश यांचा न बोलताच या नात्याला होकार असल्याचे लक्षात आले होते.(mahesh kothare love story)

महेश आणि नीलिमा यांनी एकमेकांना न बोलताच विश्वासाच्या नजरेन पसंत केलं होतं. महेश आणि नीलिमा यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून आणि विशेष म्हणजे त्या दोघांचा एकमेकांसाठी होकार हा गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आला. लग्नानंतर ते एकमेकांसोबत खूप फिरले एकमेकांची आवड जाणून घेतली आणि त्यानंतर ६ ते ७ महिन्याच्या काळानंतर महेश आणि नीलिमा यांनी पेडर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात लग्न गाठ बांधली.
त्यांच्या लग्नाला आता खूप काळ लोटला असून त्यांच्या लग्नात ते जेवढे आनंदी होते तेवढेच ते आज ही आनंदी आहेत.