मराठी मनोरंजनसृष्टीसह हिंदी सिनेक्षेत्रातदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकणक्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस् तळपदे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या वृत्ताने साऱ्यांनाच धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचं झटका आल्याचे वृत्त हे सर्वांसाठीच काळजीत टाकणारे होते. श्रेयसला तातडीने मिळालेल्या उपचारांमुळे त्याच्यावरचा मोठा धोका टळला होता. (Shreyas Talpade’s Video On Instagram)
श्रेयसला हृदयविकाराचा झटका येताच त्याच्या पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपचारांमुळे त्याच्यावरचा धोका टळला व त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला रुग्णालयामधून डिस्चार्ज देणात आला. डिस्चार्जनंतर त्याच्या तब्येतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सर्व डॉक्टर्स, शुभचिंतक व श्रेयसच्या अनेक चाहत्यांचे आभार मानले होते. अशातच श्रेयसचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – आलिया-रणबीरची चाहत्यांना खास भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल
श्रेयसचा त्याच्या मुलीबरोबरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्याची लाडक्या लेकीबरोबरची मजामस्ती पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस शूज खरेदी करायला गेला असून त्याची लेक त्याला शूज घालताना दिसत आहे. श्रेयस “मी इथे शूज बघायला आलो आहे” असं म्हणत त्याच्या लेकीला “शूज बरोबर आहेत का?” असं विचारतो. यावर त्याची लेक “शुजची लेस बांधून बघते” असं क्युट अंदाजात बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. खूप छान व्हिडीओ, तुझी मुलगी खूपच क्युट दिसत आहे. बापलेकीची मज्जा अशा अनेक कमेंट्स करत श्रेयसच्या तब्येतीबाबतही विचारपूस केली आहे. अनेकांनी त्याला लवकर बरा हो. तुझ्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी हीच देवा चरणी प्रार्थना” असं म्हटले आहे.