Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. यापाठोपाठ आता अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णीही लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडीचा लग्नातील लूक नुकताच समोर आला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या लूकने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वानंदी व आशिष यांच्या लग्नासाठीच्या पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गेले काही दिवस स्वानंदी व आशिषच्या मेहंदी, संगीत व हळदी सोहळ्याचे अनेक सोहळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेर ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अल्पावधीतच या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ही जोडी लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे
स्वानंदी व आशिषचा लग्नसोहळ्यात लूक समोर आला असून स्वानंदीची गुलाबी रंगाची साडी लक्षवेधी ठरत आहे. याशिवाय अभिनेत्रीचे आकर्षक दागिने विशेष लक्ष वेधत आहेत. याशिवाय आशिषने लग्नासाठी पांढरा सदरा व गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले आहे. याशिवाय आशिषच्या हातातील शेला खास आहे. दोघांचा लग्नातील हा मराठमोळा लूक भाव खाऊन गेला आहे.