शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिया-रणबीरची चाहत्यांना खास भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2023 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
animal fame bollywood actor ranbir kapoor and alia bhatt revealed daughters raha photo viral on social media

आलिया-रणबीरची चाहत्यांना खास भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता रणबीर कपूर हा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री आलिया हेदेखील तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. अशातच ही जोडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मुलगी राहा. रणबीर-आलिया यांच्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओद्वारे त्यांनी राहाची पहिल्यांदाच ओळख करुन दिली आहे. अल्पावधीतच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसादही दिला आहे. (Raha Face Reveled)

रणबीर-आलिया या जोडीने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. यानंतर आलियाने ५ नोव्हेंबरला तिच्या लेकीला जन्म दिला. गेल्याच महिन्यात आलियाने राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. गेले वर्षभर आलियाने लेकीचा कोणताच फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांनी राहाचा चेहरा दाखवण्याची विनंतीही केली. मात्र, आलियाने योग्य वेळ आल्यावर ती आपल्या मुलीची मीडिया व जगासमोर ओळख करून देणार असल्याचे सांगितले होते आणि अशातच नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर-आलियाने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

आणखी वाचा – Video : वडिलांच दुसरं लग्न अन् लेकाचा भन्नाट परफॉर्मन्स; अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर राहाच्या पहिल्या लूकचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये राहा गुलाबी स्कर्ट व पांढऱ्या टॉपमध्ये दिसत आहे. या ड्रेसखाली तिने लाल रंगाचे शूजदेखील परिधान केले आहेत. त्याचबरोबर केसांच्या दोन वेण्यांमध्ये राहा खूपच गोंडस दिसत आहे. रणबीर-आलिया यांनी राहाला आपल्या हातांवर उचलत कॅमेऱ्यासमोर पोजेस दिल्या आहेत. तसेच या व्हायरल व्हिडीओमध्ये राहाचा क्युट अंदाज दिसत आहे.

आणखी वाचा – बहिणीची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने घेतला खास उखाणा, म्हणाली, “आयुष्यभरासाठी बांधली…”

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला  आहे. व्हिडीओखाली कमेंट्समध्य नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये राहाला आलिया भट्टची कॉपी म्हटलं आहे, तर काही जण ती तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एकाने राहा रणबीर कपूरसारखी दिसत नसल्याचेही म्हटले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली राहाच्या सुंदर डोळ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, राहामुळे अनेकांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Tags: alia bhattbollywoodbollywood newsentertainmententertainment newsraha kapoorranbir kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : लग्नाच्या शाही लूकनंतर गौतमी-स्वानंदच्या रिसेप्शन लूकचीही चर्चा, कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.