मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाची लगबग सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री गौतमी-स्वानंद यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. तर स्वानंदी व आशिष यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अरबाज खानही लग्नबंधनात अडकला आहे. काल २४ डिसेंबर रोजी अरबाज व शुरा दोघेही विवाहबंधनात अडकले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Arhaan’s Video On Instagram)
अरहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरहानने वडिलांच्या लग्नात गिटार वाजवल्याचे पाहायला मिळाले. अरहान गिटार वाजवत असताना त्याचे वडील अरबाज अरहानला कॅमेऱ्यात कैद करतानाही दिसला. अरबाजने स्वत:च्या मोबाईलमध्ये आपल्या लेकाचा खास व्हिडीओ काढला आहे. तसेच अरहानने या लग्नात डान्सही केला. अरहानचा हा गिटार वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – बहिणीची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने घेतला खास उखाणा, म्हणाली, “आयुष्यभरासाठी बांधली…”
अरबाज व शुरा खान यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. तसेच या लग्नसोहळ्याला त्याचे जवळचे कुटुंबीय व मोजकाच मित्रपरिवार उपस्थित होता. अरबाज-शुरा यांचा हा विवाहसोहळा पार पडताच अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अरबाज व शूरा यांच्या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स व कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – पेस्टल रंगाचा पोशाख, टेम्पल ज्वेलरी अन् मोत्यांच्या मुंडावळ्या; गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी
अरबाजने लग्नात खास पोशाख परिधान केला होता. त्याने फुलांच्या डिझाईन असलेला कोट व त्यावर सोनेरी रंगाची पॅंट परिधान केली होती तर, शुरानेही अरबाजच्या कपड्यांना साजेसा असा पेस्टल रंगाचा गुलाबी लेहेंगा व त्यावर सोनरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तसेच “आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी व माझी मैत्रीण आजपासून कायमचे एकत्र झालो आहोत. या खास दिवशी मिळालेल्या तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद.” असं म्हणत अरबाजने हे खास फोटो शेअर केले आहेत.