शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘हा’ आहे मकरंद अनासपुरे यांचा आगामी चित्रपट, कोकणात शूटिंगला सुरुवात

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 1, 2023 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actor makrand anaspure new marathi movie ovaa shooting started in kokan ori village

'हा' आहे मकरंद अनासपुरे यांचा आगामी चित्रपट, कोकणात शूटिंगला सुरुवात

आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेते मकरंद अनासपुरे. मकरंद यांनी आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या संवाद फेकण्याच्या व विनोद करण्याच्या अनोख्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी भूमिका केल्या असल्या, तरी गंभीर भूमिका करण्यातदेखील त्यांचा तितकाच चांगलाच हातखंड आहे. अशातच त्यांच्या नवीन चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मकरंद यांच्या आगामी ‘ओवा’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू असून या चित्रपटाचे शूटिंग हे कोकणात होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘हापूस’ या चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा कोकणात चित्रपट शूट करण्यासाठी गेले आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानुसार कोकणातील ओरी या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. स्वकेंद्री व हेकेखोर स्वभावाचा एक निवृत्त अधिकाऱ्याला अनेक वर्षं सहन केल्यावर एकेदिवशी त्याच्या पत्नीचा अचानक झालेला उद्रेक असा या चित्रपटाचा आशय असल्याचे म्हटले जात आहे.    

View this post on Instagram

A post shared by Makrand Anaspure (@makrand.anaspure)

आणखी वाचा – ‘झिम्मा २’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु, दुसऱ्या आठवड्यात केलं दमदार पदार्पण, बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

या चित्रपटात मकरंद यांच्याबरोबर अभिनेत्री मिताली जगताप ही  मुख्य भूमिकेत आहेत. श्रीकांत बोजेवार यांनी कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. अरविंद सागोळे यांनी संगीत दिलं आहे. तर ‘पेन्शन’ व ‘फेक मॅरेज’ हे चित्रपट करणाऱ्या सॅवी गोयल यांनी ‘ओवा’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. मकरंद यांच्या या नव्या चित्रपटाचं शीर्षक तर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील त्यांची नेमकी भूमिका काय असणार याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा – अशी आहे शुभंकर-अमृताची लव्हस्टोरी! अभिनेता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “कुछ बाते बस हो जाती है…”

दरम्यान, ‘दे धक्का २’ नंतर बरेच दिवस ते मोठ्या पडद्यावर दिसले नव्हते. मध्यंतरी ते सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. अशातच आता त्यांच्या आगामी ‘ओवा’ या नवीन चित्रपटासाठी व या चित्रपटातील त्यांच्या अनोख्या भूमिकेसाठी चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत.

Tags: entertainment newsMakrand anaspuremarathi actormarathi entertainmentnew movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Animal Marathi Movie Review in Marathi

Animal Review : 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहावा की नाही? पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले, "सिनेमा सुरु झाला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.