बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला असून या चित्रपटाने आता दुसऱ्या आठवड्यात यशस्वी असं पदार्पण केलं आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर व गाण्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली होती. यानंतर आता चित्रपटाने प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे.
चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अक्षरशः गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. (Jhimma 2 Box Office Collection)
‘झिम्मा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल सात कोटींच्या घरात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील समस्त महिलावर्ग या चित्रपटाला भरभरून पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. आता लवकरच हा चित्रपट महाराष्ट्राबाहेरही म्हणजेच परदेशातही प्रदर्शित होणार आहे. यावरूनच चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचं सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेत्री सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहेत. या कलाकार मंडळींवर प्रेक्षकांनीच नव्हे तर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही प्रेम करताना दिसत आहेत. सात दिवसांत या चित्रपटाने करोडोंचा गल्ला जमवला आहे. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. आतापर्यंतचा बॉक्स ऑफिसचा आकडा पाहता ‘झिम्मा २’ हा लवकरच ‘झिम्मा’चा रेकॉर्ड ब्रेक करणार असं चित्र दिसतंय. सिनेमाने सात दिवसांत जळपास ७.७१ कोटींची कमाई केलेली पाहायला मिळत आहे.
‘झिम्मा २’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटात सात बायकांची मैत्री अधिकच घनिष्ट असलेली पाहायला मिळाली. सात मैत्रिणी व त्याच्या सात तऱ्हा या चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षक या कलाकारांचा अभिनय पाहता त्यांच्या विनोदावर, संवादांवर टाळ्या, शिट्या वाजवत आहेत.