Animal Hindi Movie Cast Review Rating : गेल्या काही दिवसांपासून ‘अॅनिमल’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी विशेष मेहनत घेताना दिसले. आपला चित्रपट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी जोरदार प्रमोशन केले. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढविली होती. अशातच ‘अॅनिमल’ चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरू झाले आहेत.
चित्रपटात रणबीर कपूरचा हिंसक लूक व धमाकेदार अॅक्शन पाहणं रंजक ठरतंय. प्रेक्षकांनी ‘अॅनिमल’ चित्रपट पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शो हजेरी लावली. चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवसही झाला नाही आहे मात्र सर्व चित्रपटगृहांमध्ये शो फुल्ल झालेले पाहायला मिळत आहेत. बऱ्याच इच्छुक प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी तिकीट उपलब्ध नसल्याचंही चित्र दिसत आहे. दरम्यान काही प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला. यावेळी चित्रपटाचा पूर्वार्ध कसा होता याबाबत अनेकांनी भाष्य केलं.
आणखी वाचा – ‘झिम्मा २’ चित्रपटाची विक्रमी कमाई, सात दिवसांतच कमावले ‘इतके’ कोटी
#FirstHalf: #Animal starts with #Ranbir montage looks and follows by childhood episode. The Father son story told on the lines of blood bath. Never gets bored. Experience the full on action explosion. Still waiting for main conflict in the plot, leads to huge 2nd half.#Rashmika pic.twitter.com/jDnqvoR0d0
— TFI Talkies (@TFITalkies) December 1, 2023
फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. ‘अॅनिमल’चा एक सीन शेअर करत एकजण म्हणाला आहे की, “अप्रतिम फर्स्ट हाफ”, तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, “हा पहिला बॉलीवूड पॅन इंडिया ब्लॉकबस्टर असेल. कथा, पटकथा, संगीत, रणबीर कपूरचा अभिनय. हे सर्व या चित्रपटाचे प्लस पॉइंट्स आहेत. वजा करण्यासारखे काही नाही” असं म्हणत रिव्ह्यू दिला आहे. तर आणखी एका युजरने ” ‘चित्रपट तीन तासांपेक्षा जास्त असल्याने मला आश्चर्य वाटले की आपण इतका वेळ बसू शकू का? चित्रपट कधी सुरू झाला, तो कधी संपला हे मला कळालं नाही” असं म्हटलं आहे.
Cinema next level Bhayya
— BadA$$ (@leo_dassss) December 1, 2023
Ranbir swagg ahh character mass antey????????
Bgm vere level ????
Inka first half mad stuff????
Bobby deol????
End credits assalu miss avadhu????
And finally
Arey @imvangasandeep ela ra ila em kotti testav ra cinema ni madd ra nuv ????
????????#Animal #animalmovie pic.twitter.com/EYpYrWjYRU
रणबीर कपूर व्यतिरिक्त चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. तर चित्रपटाचे एकूण बजेट १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओलची भूमिका भाव खाऊन गेली आहे.