शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्रसाद ओकचा लेक सार्थक झाला पदवीधर, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “सगळ्यांपासून लांब राहून…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 20, 2023 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Prasad Oak son Graduation Ceremony

Video : प्रसाद ओकचा लेक सार्थक झाला पदवीधर, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, "सगळ्यांपासून लांब राहून…"

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने त्याच्या कारकिर्दीत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं असून त्याने साकारलेल्या प्रत्येक पात्राला रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला प्रसाद दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं नशीब अजमावत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर, तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. तो त्याचे फोटोज व व्हिडीओज पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. विशेष म्हणजे, त्याच्या मजेशीर व्हिडीओची अनेकदा चर्चा होत असते. (Prasad Oak son Graduation Ceremony)

प्रसाद व मंजिरी ओकला सार्थक व मयांक अशी दोन मुलं आहेत. नुकतंच प्रसाद त्याच्या कुटुंबियांसह विदेश दौऱ्यावर आहे. त्या दौऱ्यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओज इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. आता प्रसादने त्याच्या लेकाचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्टदेखील लिहिली आहे. प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असून नुकतंच त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी प्रसादसह पत्नी मंजिरी आणि लेक मयांकदेखील उपस्थित होते.

सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली असून हा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये सार्थक पदवी प्रदान करण्यासाठी जेव्हा मंचावर जातो, तेव्हा त्याची आई मंजिरी आनंदात ओरडताना दिसते. यावेळी या सोहळ्यानंतर ओक कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

या व्हिडीओला अभिनेत्याने कॅप्शनमध्ये असं लिहिलं की, “सार्थक… आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसाने घेतलास. खूप कष्ट केलेस, अभ्यास केलास! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं, असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा!”. तर मंजिरीने तिच्या पोस्टला “कमाल क्षण , कमाल अनुभव, कमाल भावना. आयुष्याचं सार्थक झालं!”, असं कॅप्शन दिलं. दोघांच्या या पोस्ट्सवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तसेच, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, क्रांती रेडकर, जितेंद्र जोशी व अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन केलं.

हे देखील वाचा – ‘लंडन मिसळ’चा धमकेदार टीझर प्रदर्शित, भरत जाधवांसह ऋतुजा बागवेच्या लूकने वेधलं लक्ष, डायलॉग चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

सध्या प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासह ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचबरोबर ‘महापरिनिर्वाण’, ‘जिलबी’, ‘वडापाव’, ‘पठ्ठे बापूराव’ हे चित्रपट येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं शूट पूर्ण केलं होतं, जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: manjiri oakmarathi actorprasad oakprasad oak & manjiri oakPrasad Oak son Graduation Ceremony
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Marathi News

बहिणीची पाठवणी करताना अभिषेक देशमुखने शेअर केले खास फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाला, "अमृता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.