Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. शनिवारी (१८ नोव्हेंबर) पुण्यातील तळेगाव येथे ही जोडी लग्नबंधनात अडकली. मराठमोळ्या पद्धतीने हा शाही सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवारासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटोज व व्हिडीओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या फोटोजवर चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. (Abhishek Deshmukh goes emotional after sister Amruta Deshmukh Marriage)
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. या जोडीने त्यांच्या नात्याची जाहीर घोषणा केली, तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रसाद-अमृताच्या साखरपुडा सोहळ्यापासून ते लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटोजची बरीच चर्चा रंगली. आता या लग्नसोहळ्याचे अनेक फोटोज सोशल मीडियाद्वारे समोर येत आहे. अमृताचा भाऊ व अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतंच या लग्नसोहळ्यातील खास फोटोज त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.
हे देखील वाचा – Video : प्रसाद ओकचा लेक सार्थक झाला पदवीधर, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “सगळ्यांपासून लांब राहून…”
शेअर केलेल्या या सोहळ्यातील फोटोजमध्ये अभिषेकने अमृता व प्रसादच्या खांद्यावर हात ठेवला असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर, अभिषेकची पत्नी कृतिका देव, त्याचे आई-वडील आणि या जोडीचा एक फॅमिली फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर, शेवटच्या फोटोमध्ये अभिषेक आपल्या बहिणीची पाठवणी करत असून यावेळी तो भावूक झाल्याचं दिसत आहे. “अमृता, खूप खूप आनंद, प्रेम आणि शुभेच्छा”, असं म्हणत त्याने या जोडीला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा – क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीने घातले गणरायाला साकडे, फोटो शेअर करत म्हणाली, “आजची मॅच…”
अभिषेकची ही पोस्ट चाहते व नेटकरी यांना भावली असून या पोस्टवर भरभरून प्रेम देत आहे. या पोस्टवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील सहकलाकार कौमुदी वलोकर हिने “सगळ्यांच्या सुंदरतेचं कौतुक करुन न्याय तरी कसा द्यावा?”, अशी कमेंट करत देशमुख कुटुंबियांचे कौतुक केले. एकूणच, अभिषेकची ही पोस्ट पाहून चाहते भारावले आहेत. अभिषेक सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यश ही भूमिका साकारताना दिसतो. त्याच्या अनेक फोटोज व व्हिडीओजची नेहमीच चर्चा होत असते.