टीव्हीवरील ‘बिग बॉस १७’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमधील स्पर्धक अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील तिच्या वागणुकीमुळे त्याचबरोबर पती विकी जैन याच्याबरोबरच्या भांडणामुळे सोशल मीडियावर या जोडीबद्दल कायमच चर्चा होताना दिसतात. यादरम्यान या शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंकिताबद्दलच्या अनेक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. व्हिडीओमधून ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर काहीतरी घडलं असल्याचे दिसत आहे. (Ankita Lokhande Confirms Her Pregnancy In Bigg Boss)
या व्हिडीओमध्ये ती स्वयंपाकघराच्या परिसरात बसलेल्या रिंकू धवन व जिग्ना वोरा यांच्याशी बोलत आहे. त्यांच्याशी बोलताना ती रिंकू व जिग्ना यांना असे म्हणते की, “मला आंबट खाण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे मी रोज काहीतरी आंबट खाण्याच्या शोधातच असते”. यावर रिंकू व जिग्ना यांच्यात अंकिता गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा रंगतात आणि ते तिच्या गरोदरपणाबद्दल बोलतात. यावर रिंकू “बिग बॉस’च्या घरात खरंच आम्हाला गोड बातमी ऐकायला मिळणार का?” असं म्हणते.
आणखी वाचा – अभिनेता महेश बाबूने वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्ही कराल त्याचं कौतुक
त्याचबरोबर पुढे रिंकू म्हणते की, “तू मला चूक सिद्ध करेपर्यंत मी तुझी काळजी घेईन आणि तू मला चूक सिद्ध करू नये असे मला वाटते, मला तुझ्यासाठी खूप आनंद आहे”. यावर अंकिता रिंकूला “या घरात हे शक्य नाही” असं उत्तर देते. तेव्हा पुन्हा रिंकू तिला असे म्हणते की, “कदाचित शोमध्ये येण्याच्या आधीपासूनच ती गरोदर असू शकतेस” यावर अंकितादेखील “या सगळ्याचा विचार करूनच मला खूप भीती वाटते आहे” असं म्हणते. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताच्या काही चाचण्यादेखील करण्यात आल्या आहेत. ज्याचे रिपोर्टस येणं बाकी असल्यामुळे तिला नेमकं काय झालं आहे? याविषयी सांगणे कठीण जात आहे. मासिक पाळीही आली नसल्याचं अंकिताने यावेळी सांगितलं.
आणखी वाचा – तमन्ना भाटिया व विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?, आई-वडिलांच्या दबावामुळे घेतला निर्णय कारण
दरम्यान या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर अंकिता लवकरच गुड न्यूज देणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. अंकिताच्या या गरोदरपणाबद्दल ‘बिग बॉस’च्या घरात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. पण सोशल मीडियावर अंकिता-विकीच्या चाहत्यांमध्ये या बातमीला घेऊन बऱ्याच अफवा सुरु आहेत. दरम्यान ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच शोमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पर्धकाच्या गरोदरपणाबद्दलची बातमी पसरली असल्याचे म्हटले जात आहे.