बॉलीवूड व हिंदी टीव्हीविश्वातील अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनेक कार्यक्रम व मालिकांमध्ये छोटी-मोठी भूमिका करणाऱ्या सुनीलला ‘द कपिल शर्मा शो’मधून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पण काही महिन्यांपूर्वी सुनीलने हा कार्यक्रम सोडला होता. त्यानंतर तो अनेक चित्रपट व वेबसिरीजमध्ये दिसला आहे. ज्यात त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण, प्रेक्षकांचा हाच आवडता अभिनेता एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. (Sunil Grover Viral Video)
अभिनेता सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो त्याच्या कामाचे व खासगी आयुष्यातील अनेक फोटोज व व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच शेअर करतो. एकीकडे त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओनुसार, हा विनोदी अभिनेता चक्क भर बाजारात लसूण विकताना दिसत आहे.
सुनील ग्रोव्हरने खुद्द हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका स्टूलवर बसलेला असून त्याच्यासमोर लसणाचा ढीग आहे. त्यामधून तो आलेल्या ग्राहकांना वजन करून लसूण विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुनीलने “हमारी अटरियां” असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते आवाक् तर झालेच, शिवाय या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
हे देखील वाचा – ‘चांद्रयान ३’च्या महिला शास्त्रज्ञांचा टिकली, मंगळसूत्र व साडीमधील लूक, फोटो पाहिल्यानंतर कंगना रणौत म्हणते, “भारतातील आघाडीचे…”
या अभिनेत्याने याआधी दूध, शेंगदाणे, फळं अशा विविध गोष्टी विकताना दिसला असून त्याचे हे व्हिडिओज तितकेच व्हायरल झाले होते. मूळचा हरयाणाचा असलेल्या सुनीलने छोटा पडदा गाजवल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक नावाजलेल्या कलाकारांसह चित्रपट केले आहे. लवकरच त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यात ती शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. (Sunil Grover Viral Video)