संपूर्ण देश ‘चांद्रयान ३’ च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. हे यश भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. अनेक स्तरातून या यशस्वी मोहिमेचं व मोहिमेतील प्रत्येकाचं कौतुक केलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी हे यश साजरं देखील केलं जात आहे. अनेक कलाकार मंडळींनी ‘चांद्रयान ३’ साठी सज्ज असलेल्या मोहिमेचं कौतुक केलं आहे. अशातच अभिनेत्री कंगना रणौतने या मोहिमांवर काम करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. (Kangana Ranaut On Chandrayaan 3 Scientist)
कंगनाने केलेली ही पोस्ट प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी आहे. या मिशनवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे फोटो शेअर करताना तिने त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. त्यांच्या सध्या राहणीमानाचं व उत्तम विचारांचं तिने कौतुक केलं आहे.
कंगना रणौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने ‘चांद्रयान ३’ मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहताना दिसतोय. बरं कंगनाने शेअर केलेल्या या फोटोची खासियत म्हणजे या सर्व महिला शास्त्रज्ञ इस्रोमध्ये कार्यरत आहेत. ज्या साडी नेसून व कपाळावर टिकली लावून इस्रो केंद्रात काम करतात.

हा फोटो शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, “भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ टिकली, सिंदूर व मंगळसूत्र लावून आहेत. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे हे प्रतीक म्हणायला हरकत नाही. भारतीयत्वाचे हेच खरे मर्म आहे”. कंगनाने या कॅप्शनसह भारतीय ध्वजाचे इमोजी शेअर केले आहेत.
कंगना राणौतच्या लवकरच पी वासू दिग्दर्शित ‘चंद्रमुखी २’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय कंगना लवकरच ‘तेजस’ व ‘इमर्जन्सी’ चित्रपटांमध्येही दिसणार आहे.