मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अग्रेसर असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. नव्वदीच्या दशकापासून त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मालिका, चित्रपट, नाटक किंवा वेबसीरिज या चारही क्षेत्रात आपल्या अभिनयानं व सौदर्यानं त्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. पन्नाशी ओलांडली असली तरीही त्यांच्या फिटनेसची चर्चा तरुण चाहत्यांमध्ये नेहमीच होताना दिसते. त्यांच्या सौंदर्याचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. अशा या एवरग्रीन अभिनेत्रीच्या कपाळावरील खूण नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेते. नेमकी ही खूण काय आहे? याचा खुलासा स्वतः ऐश्वर्या नारकर यांनीच केला.(Aishwarya Narkar On Her Birthmark)
ऐश्वर्या यांनी वेगवेगळ्या भूमिका साकरत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’ अशा मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘ये प्यार ना होगा कम’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ अशा हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्या विविध व्हिडिओ, रील्स आणि फोटो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांची नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ताली’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होत आहे. यामध्ये ऐश्वर्या यांनी केलेलं काम विशेष कौतुकाचं कारण ठरलं आहे. आता ऐश्वर्या यांनी स्वतःबाबत मोठा खुलासा केला आहे. इन्स्टाग्रावर ‘आस्क मी क्वेशन’ असं म्हणत त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत.
वाचा – ऐश्वर्या यांच्या चेहऱ्यावर काय आहे ही नेमकी खूण? (Aishwarya Narkar On Her Birthmark)

इन्स्टाग्रामच्या या सेशनमध्ये चाहत्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. ज्यात फिटनेसपासून ते वयाचं गुपीत उलघडण्यापर्यंतच्या प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली आहेत. त्यांना एका चाहत्याने कपाळावर असलेल्या खुणेबाबत विचारले,“ मॅम तुमच्या कपाळावरची खूण खूप छान दिसते. पण माफ करा ती खूण नेमकी काय आहे?” असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देत ऐश्वर्या यांनी आपला कपाळावर खूण असलेला फोटो शेअर करत ‘जन्मखूण’ असं उत्तर दिलं. ऐश्वर्या यांच्या कपाळावर असलेली ही जन्मखूण त्यांचं सौंदर्य अजूनच खूलवते.
आणखी वाचा – फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…
ऐश्वर्या यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहेत.