‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरांत पोहोचली. तिने छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. अंकिता इथवरच थांबली नाही. तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. ‘मणिकर्णिका’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. कामाबरोबरच अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. आताही तिने पती विकी जैनबरोबर शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. (Ankita Lokhande Get Married Again)
अंकिताने पती विकीबरोबरच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. अंकिता सध्या युरोपमध्ये विकीसह सुट्टी एण्जॉय करत आहे. यादरम्यानचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. २०२१मध्ये अंकिता व विकीचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आता पुन्हा एकदा लग्न केलं असल्याचं अंकिताने फोटो शेअर करत म्हटलं आहे. पण हे लग्न काही वेगळं आहे. तिने यादरम्यानचा व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
वाचा – कसा पार पडला अंकिताचा लग्नसोहळा ! (Ankita Lokhande Get Married Again)
अंकिता व विकीने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी तिला गुडघ्यावर बसून फुलं देताना दिसत आहे. ते पाहून ती खूश होते. त्यानंतर दोघं एकमेकांना किस करतात. त्यांच्या लिप लॉकचीही सध्या बरीच चर्चा रंगत आहे. पुन्हा लग्न केल्यानंतर दोघांनी रोमँटिक फोटोशूटही केलं.
“आम्ही पुन्हा लग्न केलं आहे” असं अंकिताने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तिने घातलेले दागिने विशेष लक्षवेधी आहेत. तर विकीनेही कोट परिधान केला आहे. अंकिताला मात्र नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. हे सगळं नाटक आहे, पुन्हा लग्न करण्याची काय गरज?, हे नाटक बंद करा अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.