छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला एक तरुण चेहरा म्हणजे ओंकार राऊत. ‘टाईमपास’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारा ओंकार राऊत आज मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. हाच ओंकार राऊत आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. (Onkar Raut Birthday)
अभिनेता ओंकार राऊतने नाटक, चित्रपट, वेब सिरीज व छोटा पडदा या सर्वच माध्यमातून आपला अभिनयाचा डंका वाजवला आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कॉमेडी शोमधून ओंकारला अफाट लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन करतो. अभिनयाबरोबरच ओंकारने अनेक नाटक व एकांकिकेचे लेखन-दिग्दर्शनही केले आहे.
वाढदिवसानिमित्त आज ओंकार राऊतवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनेता समीर चौघुलेनेही ओंकारसाठी खास पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समीरने ओंकारसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय, “वाढदिवसाच्या फुल्टू शुभेच्छा… गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसानिमित्ताने काही कारणास्तव पोस्ट टाकली नाही. पण या वर्षी मी ही संधी गमावणार नाही… साधारणतः दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला रंगकर्मी. रुपारेल महाविद्यालयात एकांकिका क्षेत्रातील मोठं नाव, नाटकावर मनापासून प्रेम करणारा असल्याने एखाद-दोन प्रहसनातच तो हास्यजत्रेत रुळला. कारण आमच्या ओंक्याची grasping करण्याची क्षमता अफाट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं “शिकण्याची आणि इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे.”
“प्रत्येक स्किटनंतर पाटी कोरी करून गोस्वामी सरांसमोर नव्याने धडे गिरवायला बसण्याची वृत्तीच तुला अजून मोठं करणार ओंकार. ओंकारचं आणि माझं खास नातं आहे. understanding आहे. हॉलिवूडची प्रत्येक ॲक्शन फिल्म आम्ही एकत्र बघतो. क्रिकेट आमच्या दोघांचाही श्वास आहे. अरिजित सिंगचं “खैरियत पूछो”हे गाणं आम्हा दोघांनाही प्रचंड आवडतं. आमच्या राऊतला “कंटाळा” आणि “आता कशाला?” हे शब्द खूप आवडतात. वरवर अत्यंत बेपर्वा आणि कूल वाटणारा ओंकार मात्र स्वतःच्या कामाबद्धल अत्यंत सिरियस आहे. एखादं स्किट पडल्यावर स्वतःवरच चिडणारा ओंकार मी जवळून बघितलाय. वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा आमचा मनोमिलन स्वरछेडे आतून खूप हळवा आहे. अश्या या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”, असं समीर चौघुले पोस्टमध्ये म्हणाला.
हे देखील वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोंची चर्चा
हे देखील वाचा – “आनंद दिघेंच्या नावावर सहानुभूती…” ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “एकनाथ शिंदे पुन्हा…”
पाहा ओंकार राऊत काय म्हणाला (Samir Choughule wishes Onkar Raut on his Birthday)
समीरच्या या पोस्टवर ओंकारने शुभेच्छा स्वीकारत म्हटलंय, “दादा !!!! काय बोलू आणि काय नको असं झालंय !!! थँक यू सो मच !! तुझ्यामुळेच सगळं झालंय ! I love you !!! ❤️❤️❤️”. हास्यजत्रेतील कलाकारांसह चाहतेही ओंकारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अभिनेता ओंकार राऊतने ‘टाईमपास’ व ‘टाईमपास ३’ चित्रपटात काम केलं आहे. शिवाय फ्रेशर्स, पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतही तो झळकला आहे. (Samir Choughule wishes Onkar Raut on his Birthday)