Shiva Serial New Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. रोखठोक, रावडी, करारी, समंजस, मनमिळाऊ आणि नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या शिवाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत शिवा आणि आशूची जोडी एकत्र आलेली पाहायला मिळाली. शिवा व आशु यांचं एकत्र येणं काही दिवस आशुच्या घरातल्यांना गोष्ट मान्य नव्हती. मात्र, शिवाने तिच्या स्वभावानं घरच्यांची मन जिंकली. आता सासरीही शिवाच्या म्हणण्यानुसार सूत्र हलताना पाहायला मिळत आहेत. मात्र अद्याप आशुने शिवावरील प्रेमाची कबुली दिलेली नाही. एकीकडे तो शिवाच्या प्रेमात पडत चालला असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हे शिवाला कसं सांगायचं हे त्याला कळत नसतं. तर शिवा सुरुवातीपासूनच आशुच्या प्रेमात असतो.
आशुने लग्न झाल्यानंतर आपल्यात फक्त मैत्री आहे असं शिवासमोर कबूल केलेलं असतं आणि शिवाने सुद्धा ते स्वीकारलेलं असतं. मात्र आशु एकीकडे शिवाच्या प्रेमात पडला असला असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता तो शिवावरील प्रेम व्यक्त करणार असल्याचे दिसतंय. शिवासाठी खास सरप्राईज अरेंज करुन तो शिवासमोर प्रेमाची कबुली देणार असतो. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये शिवा व आशु यांच्यामध्ये खूप मोठी दरार आली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिवा-आशुमध्ये आलेली ही भिंत म्हणजेच दिव्या.
आणखी वाचा – “सतत मारायचे, ते हुकूमशहाच होते आणि…”, वडिलांचा द्वेष करतो आयुष्मान खुराणा, म्हणाला, “मानसिक आघात…”
मालिकेच्या प्रोमोमध्ये पाना गॅंगच्या सांगण्यावरुन शिवा नटून थटून बसलेली असते. तर आशुसुद्धा खूप खुश असतो. आशु शिवासमोर प्रेमाची कबुली द्यायला जातो त्यावेळी गाडीसमोर कोणीतरी येते आणि तो ब्रेक मारतो. गाडीतून बाहेर येऊन पाहतो तर शिवाची बहीण दिव्या असते. तिला समोर पाहून आशू म्हणतो, “मूर्ख आहेस तू?”. दिव्या त्याच्यासमोर एक चिठ्ठी धरते आणि म्हणते, “हे शिवाला देशील?”, आशू तिला विचारतो, “काय आहे हे?”, पण चिट्ठी देऊन ती निघून जाते. आशू ती चिठ्ठी उघडून बघतो आणि त्याचा चेहरा गंभीर होतो. तर तिकडे शिवा वाट बघत असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “कृपया आता काही नवीन दाखवू नका, शिवाचा वाढदिवस खराब करु नका”, “या सगळ्याची गरज होती का? आशू प्रपोज करायला जातोय आणि दिव्या मध्येच मांजरीसारखी आडवी आली”, “प्लीज ही तरी मालिका चांगली राहू द्या. बाकीच्या मालिकांची वाट लावली आहेच, या मालिकेत असे काही नको”, “कृपया आता काही नवीन दाखवू नका, शिवाचा वाढदिवस खराब करु नका”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.