Ayushmann Khurrana On Father : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही. यावर्षी आयुष्यमान पडद्यापासून दूर राहिला असला तरी तो चर्चेत राहिला. बरेचदा अभिनेता त्याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसला तर कधीकधी एखाद्या कार्यक्रमात स्थान मिळवण्याबद्दल दिसला. यानंतर आता आयुष्मान एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या वडिलांबद्दल एक खुलासा केला आहे, ज्याने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. त्याने त्याच्या बालपणीच्या आघाताबद्दल सांगितले आहे, जेव्हा त्याला बेल्ट व चप्पलने मारहाण करण्यात आली होती.
‘विकी डोनर’ अभिनेता सध्या त्याच्या ‘आयुष्मानभाव’ या म्युझिकल बँडमुळे चर्चेत आहे. त्यासाठी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. प्रामाणिकपणे सांगणाऱ्या पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. संगीताप्रती असलेले प्रेम व आपुलकीबाबतही त्याने भाष्य केलं. तो म्हणाला, “मी वयाच्या २० व्या वर्षी वडील झालो. याचा अर्थ, जेव्हा विकी डोनर रिलीज झाला तेव्हा मी आधीच वडील होतो. तो खूप वेगळा अनुभव होता. ताहिरा आणि मी दोघेही एकत्र वाढलो कारण आम्ही लहान वयातच पालक झालो”.
आणखी वाचा – Video : दगडफेक, चप्पलही फेकून मारली अन्…; ‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचला मोठा गोंधळ, पोलिसांनी लाठीमार करताच…
अभिनेत्याने पुढे सांगितले की त्याच्या आयुष्यात त्याच्या मुलीच्या आगमनाने त्याचे आयुष्य किती बदलले. तो म्हणाला, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला मुलगी झाली. तुम्ही एक चांगली व्यक्ती बनता. मुली तुमच्या व इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात”. त्याचवेळी त्याला विचारले की, ते त्यांच्या वडिलांसारखे आहेत की त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत?”, या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss मराठी फेम सुप्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
तो म्हणाला, “मी पूर्णपणे वेगळा वडील आहे. माझे वडील हुकूमशहा होते. चप्पल, बेल्ट इत्यादींनी मारायचे. असे करणे त्यांच्यासाठी सामान्य होते. आणि याच कारणामुळे माझ्या लहानपणी मला मानसिक आघातही झाला होता. एके दिवशी मी एका पार्टीतून परत येतो होतो आणि माझ्या शर्टला सिगारेटचा वास येत होता. माझ्या वडिलांच्या भीतीने मी सिगारेटला कधीच हात लावला नाही, पण असे असूनही मला मारहाण झाली”.