सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 anil gawas on aastad kale

"फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?", आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, "प्रेक्षक तुम्हाला…"

 anil gawas on aastad kale : काही दिवसांपासून अभिनेता आस्ताद काळे चर्चेत आला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकादरम्यान प्रेक्षकांचा फोन वाजल्याने आस्तादने संताप व्यक्त केला. फोन वाजल्याने त्याचा राग अनावर झाला आणि अभिनेत्यानं नाटक मध्येच थांबवून त्या प्रेक्षकाला सुनावलं. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रियाही दिल्या. दरम्यान काही नेटकऱ्यांनीही या प्रकरणावर आपलं भाष्य केलं. काहींनी आस्तादला या प्रकरणावर आवाज उठविल्याबाबत पाठींबाही दिला. अशातच आता मराठी अभिनेते अनिल गवस यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

‘इट्स मज्जा’च्या ठाकूर विचारणार मध्ये अभिनेते अनिल गवस यांनी भेट दिली. यावेळी बोलताना आस्ताद काळेच्या संताप व्यक्त करण्यावर अनिल यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना ते म्हणाले, “विक्रम गोखलेंनीही बऱ्याचदा नाटक थांबवलेलं आहे. त्यामुळे तो एक फंडा झाल्यासारखं मला वाटायला लागलंय. आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहे. त्यामुळे प्रत्येक जण सायलेंट ठेवेलच असं नाही. आता आपल्याकडे प्रेक्षक म्हणून जे येतात ते कधी डॉक्टर असतात. काही वेळेस पेशंट असतात, त्यांची माणसं घरी असतात. त्यावेळी ते फोन चालू ठेवतात. प्रत्येकाची अर्जन्सी असते”.

आणखी वाचा – Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

पुढे ते म्हणाले, “आवडीसाठी प्रेक्षक येतात. आता त्यांना जर फोन आला आणि जायचं असेल तर आपण प्रेक्षकांची बाजू म्हणून समजून घेतलं पाहिजे. मी समर्थन करणार नाही त्यांचं, पण आपण आपलं नाटक करत जावं. मी जेव्हा दौरे केले तेव्हा बाहेर भरपूर गाणी वाजायची. मुळात हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेत इतके समरस व्हा की, तुम्हाला आवाजच आले नाही पाहिजेत. एखादा प्रेक्षक जर तुमच्या कामाला दाद देत असेल तर त्याच्याकडे कधी बघणार तुम्ही, फोन वाजतो तिकडे लक्ष का तुमचं? नाटक लोकांनी थांबवलं पाहिजे. तिसरी घंटा झाली, तुम्ही एकदा नाटकाला लागलात की, कामं करा आपली. प्रेक्षक तुम्हाला बघायला आलेत. या सगळ्यामुळे नाटकाचा रसभंग करणं चुकीचं आहे.’ असं अनिल गवस यांनी पुढे सांगितलं”.

आणखी वाचा – ‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

आस्ताद या प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हणालेला, “तुम्हाला रसिक, मायबाप प्रेक्षक म्हटलं जातं, त्यामुळे अशा चुका करणं शक्यतो टाळा. बाकी मी तुम्हाला माजुर्डा, उद्धट वाटत असेन तर माझी काहीही हरकत नाही. काहींनी असेही कमेंट केले होते की, वाक्य विसरला असेल म्हणून अशी पळवाट शोधली असेल. मी त्यांना सांगू इच्छितो की, दुर्दैवाने किंवा सुदैवाने एखादी संहिता एकदा-दोनदा वाचल्यावर मला माझेच नाही तर इतरांचेही संवाद लक्षात राहतात. इमर्जन्सी असेल तर बाहेर जाऊन फोनवर बोलू शकता”.

Tags: aastad kaleanil gawasmarathi natak controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
sambhavna seth is pregnant

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.