अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार नवाब मलिकांची मुलगी सना मलिक आणि तिच्या विरोधात अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे स्वरा भास्कर आपल्या पतीचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच स्वरा भास्करचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वरा भास्करचा पती फहाद अहमदबरोबरचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. यामुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरील वादात अडकली आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांच्याबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. (Swara Bhasker Trolled)
शनिवारी स्वरा पती फहाद अहमदबरोबर नोमानी यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेली होती. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चा स्वरा आणि फहादच्या फोटोमुळे नाहीतर, फोटोत त्यांच्याबरोबर असलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे झाली. फोटोत दिसणारी ती तिसरी व्यक्ती म्हणजे, मौलाना सज्जाद नोमानी ही आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी, स्वरा आणि फहादबरोबर आहेत. नोमानी यांच्या शेजारी उभी असलेली स्वरा फोटो क्लिक करताना दिसली.
जनाब हज़रत मौलाना सज्जाद नौमानी साहब की ख़िदमत में हाज़िर हुए और उन्होंने हमे खूब दुआओं से नवाज़ा pic.twitter.com/5P7S3OIaJj
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) November 16, 2024
आणखी वाचा – आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video
हे तेच नोमानी आहेत, ज्यांनी यापूर्वी महिलांच्या शिक्षणाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मौलानांना भेटल्याबद्दल अभिनेत्रीवर टीका होत आहे. हे स्वरा भास्करने त्यांच्यासह फोटो काढल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. स्वरासह स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या तिच्या स्त्रीवादी वकिलीवरही टीका होत आहे. याबद्दल एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “स्वरा भास्कर ‘फेमिनिझम’ आणि महिला सशक्तीकरणाबद्दल बोलण्यासाठी ओळखली जाते. तरीही तिने मुलींना शाळा-कॉलेजात पाठवण्याच्या विरोधात असलेल्या सज्जाद नोमानीला भेटायचे ठरवले”.
आणखी वाचा – Bigg Boss मराठी फेम सुप्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “मी तिच्या निवडीचा आदर करतो. ती तिचे कपडे, जीवनसाथी, राजकारण आणि धर्म ठरवू शकते. पण हा तिचा ढोंगीपणा आहे. ती स्त्रीवादासाठी ओळखली जाते, पण अभिमानाने स्त्री शिक्षणाचा निषेध करणाऱ्या आणि तालिबानला पाठिंबा देणाऱ्या पुरुषाबरोबर उभे राहून केवळ हे सर्व मतांसाठी करते”. त्यामुळे एकूणच स्वरा भास्कर महिलांच्या अधिकारांबाबत नेहमी बोलत असते. मात्र आता महिलांच्या शिक्षणाबद्दल जुनाट विचार बोलून दाखविणाऱ्या मौलाना यांच्याबरोबर फोटो कसा काढला? असा आक्षेप काही लोक घेत आहेत.