गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2026 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sambhavna seth is pregnant

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

sambhavna seth is pregnant : भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री ‘बिग बॉस’ फेम संभावना सेठने अखेर गुडन्यूज दिली आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर तिने आई होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. संभावना सेठने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. संभावना सेठने सोशल मीडियावर तिच्या पाळीव कुत्र्यासोबत बाळाच्या सॉक्सचे छायाचित्र आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्टची झलक दाखवली आहे. पती अविनाश द्विवेदीसोबत शेअर केलेल्या या पोस्टमध्ये भावना सेठने लिहिले आहे की, “आम्ही गरोदर आहोत. आमची सर्वात सुंदर कथा आता प्रेम, आशा आणि सरोगसीद्वारे सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे. उलटी गिनती सुरू झाली आहे”.

संभावना यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु होत आहे. लाफ्टर क्वीन भारती सिंगने या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. आम्रपाली दुबे, दीपिका सिंग, माही विज, फ्लोरा सैनी, साकिब सलीम यांसारख्या इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनी तिचे या गुड न्यूजबद्दल अभिनंदन केले आहे. २०२४ च्या शेवटी, भावनाने IVF च्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. दुर्दैवाने, तिला तीन महिन्यांनंतर गर्भपात झाला. यानंतर तिने व्हिडिओ शेअर करत गर्भपातासाठी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. स्कॅनच्या १५ दिवस अगोदरच मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते, ज्याबद्दल त्यांना माहिती नव्हती.

आणखी वाचा – “फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

तिच्या YouTube व्हिडीओमध्ये, संभावनाने तिच्या गर्भपाताची दुःखद कहाणी सांगितली होती. तीन महिन्यांच्या गर्भधारणेनंतर तिचा गर्भपात झाल्याचे तिने सांगितले होते. या गर्भपातापूर्वी, संभावनाने देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टवर सांगितले होते की ती लवकरच चांगली बातमी शेअर करू शकते. ते म्हणाले होते की, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता दूर झाल्या असून लवकरच चांगली बातमी देतील अशी शक्यता आहे. तेव्हापासून संभावना लवकरच चांगली बातमी देईल अशी अपेक्षा होती. यानंतर पती अविनाशने एक व्हिडीओ शेअर केला आणि कुटुंब वाढवण्याचा त्यांचा आणखी एक प्रयत्न उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले.

आणखी वाचा – ‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

संभावना यांचे पती अविनाश यांनी सांगितले की, त्यांची पत्नी तीन महिन्यांची गरोदर असून सर्व काही ठीक चालले आहे. अविनाश म्हणाला होता की तो 18 डिसेंबरलाच त्याच्या सर्व चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर करणार आहे, पण दुर्दैवाने त्याला सगळ्यांना ही वाईट बातमी द्यावी लागली आहे. व्हिडीओमध्ये अविनाशसोबत संभावनाही बसली असून ती खूप उदास आणि भावूक दिसत होती.

Tags: entertainmentSambhavna Sethtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
 Sambhavna Seth life

चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.