रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्टँड-अप कॉमेडियन तिसऱ्यांदा झाला बाबा, सोशल मीडियावर दाखविली झलक, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 2, 2026 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munawar Faruqui news

स्टँड-अप कॉमेडियन तिसऱ्यांदा झाला बाबा, सोशल मीडियावर दाखविली झलक, फोटो समोर

Munawar Faruqui news : सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. आता मुनव्वर एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत आहे. मुनव्वरच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण तो तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी महाजबी कोतवाला हिने एका सुंदर छोट्या देवदूताला जन्म दिला आहे. मुनव्वरने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

मुनव्वर फारुकीने हॉस्पिटलमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये मेहजबीनने एका छोट्या परीला आपल्या मांडीवर घेतलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत मुनव्वरने आपल्या पत्नीचा हात धरलेला दिसत आहे. ही छायाचित्रे पोस्ट करत मुनव्वर फारुकी यांनी लिहिले, “घर बरकत आयी… धन्य, अलहमदुलिल्लाह. विशेषतः तुमच्या प्रार्थनेत ते लक्षात ठेवा”. मुनव्वर फारुकी याने सोशल मीडियावर ही चांगली बातमी शेअर करताच, चाहत्यांनी आणि चित्रपट-टीव्ही उद्योगातील अनेक सेलिब्रिटींनी टिप्पणी विभागात या जोडप्याचे अभिनंदन केले. वरुण धवनने लिहिले, “अभिनंदन भावा”. अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ‘माशा अल्लाह’ असेही लिहिले.

आणखी वाचा – चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

View this post on Instagram

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

मुनव्वर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांचे पहिले लग्न जस्मिनसोबत झाले होते, ज्यापासून त्यांना मिकाईल नावाचा मुलगा आहे. नंतर कॉमेडियनने मेहजबीनशी दुसरे लग्न केले. मेहजबीनला आधीच एक मुलगी आहे. आता ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता मुनव्वरला तीन मुले आहेत. त्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मुनव्वर फारुकी शेवटचा रिॲलिटी शो ‘पति पत्नी और पंगा’ मध्ये दिसला होता. त्याने हा शो सोनाली बेंद्रेसोबत होस्ट केला होता.

Tags: entertainmentMunawar FaruquiMunawar Faruqui goodnews
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
The Maharashtra Files Marathi Movie

फाईल्स उघडणार आणि व्यवस्था हादरणार; उषा नाडकर्णी, मंगेश देसाई अभिनीत ‘द महाराष्ट्र फाईल्स’ लवकरच मोठ्या पडद्यावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.