शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी वाघने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “स्वप्नांच्या यादीमध्ये…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 8, 2023 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mayuri Wagh New Home

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी वाघने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, "स्वप्नांच्या यादीमध्ये…"

सध्या सिनेसृष्टीतील बरेच कलाकार घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावरून याबाबतची पोस्ट वा फोटो शेअर करून कलाकारांनी ही गुडन्यूज शेअर केली आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवं घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे छोटा पडदा गाजवणारी मयुरी वाघ. (Mayuri Wagh New Home)

झी मराठी वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे मयुरी वाघला विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजवर अनेक मालिका मयुरीने तिच्या नावे केल्या आहेत. मयुरी अभिनयासह तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळेही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच सोशल मीडियावरून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे.

आणखी वाचा – कॅन्सरसारख्या आजाराशी ज्युनियर महमूद यांची झुंज ठरली अपयशी, हे होते शेवटचे शब्द, म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर…”

मयुरीने नुकतंच तिच्या स्वप्नातील नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. गृहप्रवेश व वास्तुशांतीचे काही खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने गुडन्यूज शेअर केली. “माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं” असं कॅप्शन मयुरीने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंना मयुरीने नवीन घर, नवी सुरूवात, कृतज्ञता, आनंदी आयुष्य असे हॅशटॅग्स दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mayuri Wagh (@mayurri.wagh_official)

आणखी वाचा – “घरात ज्यांना काडीची किंमत नसते…” , सोशल मीडियाचा वापर न करण्याबाबत उपेंद्र लिमयेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनेकजण खोटे…”

मयुरीने शेअर केलेल्या या पोस्टवर सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अभिनेत्रींच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टला लाईक्स व कमेंट केल्या आहेत. मयुरी सिनेसृष्टीतील तिच्या अभिनयासह तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. मयुरीने २०१७ मध्ये अभिनेता पियुष रानडेसह लगीनगाठ बांधली होती. परंतु, लग्नानंतर काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच पियुष रानडे अभिनेत्री सुरुची अडारकरसह विवाहबंधनात अडकला.

Tags: marathi actressmarathi malikamarathi serialmayuri waghmayuri wagh new home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
man dhaga dhaga jodte nava serial fame marathi actress divya pugaonkar bought news car video shared on instagram

Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत दिली आनंदाची बातमी, कलाकारांनीही केलं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.