मराठीतील अनेक कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत नाव कामावतात. मालिकांमधून अभिनय करत ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. याकाळात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. मात्र मेहनत व कष्ट करत ते स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करतात. यात काहींचचं घर घेण्याचे स्वप्न असतं, तर काहींचं गाडी घेण्याचे. हीच मेहनत कायम ठेवत ते त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास करतात आणि कालांतराने त्यांची स्वप्ने पूर्णही होतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती झाली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. दिव्याचे गाडी घेण्याचे स्वप्न होते आणि अखेर तिच्या या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. (Divya Pugaonkar On Instagram)
स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. मालिकेत ‘माऊ’ या मुक्या मुलीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. या मालिकेनंतर ती लगेच ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. दिव्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांमबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे तिने नवीन कार घेतल्याची बातमी दिली आहे.
दिव्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने नवीन कार घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. “शेवटी माझी राणी आली आहे” असं म्हणत तिने गाडी घेतानाचे काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. दिव्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा खास मित्रदेखील दिसत आहे. तसेच या व्हिडीओखाली गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे, पूजा बिरारी, आकाश नलावडे, अभिषेक रहाळकर, सिद्धार्थ खिरीद, कोमल कुंभार, अमेय बर्वे, नंदिता पाटकर, ऋतुजा कुलकर्णी, शर्वरी जोग या मराठी कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दिव्या सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका एका विवाहित महिलेचा घटस्फोट आणि त्यानंतर तिला करावा लागणारा संघर्ष या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करते. या मालिकेत दिव्या ‘आनंदी’ नावाचे पात्र साकारत असून तिच्या पात्राला चांगलीच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्याचबरोबर मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे. त्यामुळे कमी काळात या मालिकेने व दिव्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.