गुरूवार, ऑगस्ट 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2026 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula Pahata Movie

'तुला पाहता' चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

Tula Pahata Movie : आजवर अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहचलेला नचिकेत लेले आता आपली एक वेगळी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स’च्या मयूरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या, आगामी ‘तुला पाहता’ या चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत हा अभिनेता आणि चित्रपटाचा पार्श्वगायक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १० जुलैला “तुला पाहता” हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

“तुला पाहता” चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मयूरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

आणखी वाचा – Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

मनाला भुरळ घालणाऱ्या या चित्रपटातील “दूर दूर” हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. नचिकेत लेले आणि सई गोडबोले यांच्या सुमधुर आवाजत स्वरबद्ध करण्यात आल असून संगीतकार रोहन-रोहन या जोडीने या गीताला संगीत दिले आहे. संगीतकार रोहन गोखले याने हे गीत लिहीले असून गीतकार म्हणून त्याचे ही या चित्रपटाच्या निमित्ताने पदार्पण आहे.

आणखी वाचा – ४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

“‘तुला पाहता’ हा चित्रपट माझ्यासाठी खरंच लकी आहे. करिअर मधील पहिल्याच चित्रपटात मुख्य नायक आणि पार्श्वगायक अशा दोन्ही महत्वपूर्ण भूमिका मला साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल मी या चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या मयूरा प्रधान यांचे मनापासून आभार मानतो”, असे अभिनेता, पार्श्वगायक नचिकेत लेले याने सांगितले.

Tags: marathi actormarathi movieTula Pahata Movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Next Post
suhasini mulay Wedding

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; 'लगान' फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.