सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरसारख्या आजाराशी ज्युनियर महमूद यांची झुंज ठरली अपयशी, हे होते शेवटचे शब्द, म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 8, 2023 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Junior Mehmood Passes Away

कॅन्सरसारख्या आजाराशी ज्युनियर महमूद यांची झुंज ठरली अपयशी, हे होते शेवटचे शब्द, म्हणाले, "माझ्या मृत्यूनंतर…"

Junior Mehmood Passes Away : ७०च्या दशकातील दिग्गज ज्युनियर महमूद यांचं वयाच्या ६७व्या वर्षी निधन झालं आहे. आपल्या कॉमेडी अभिनयाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या अभिनेत्याला पाहून आज लोकांचे डोळे पाणावले आहेत. ज्युनियर महमूद रुग्णालयातून घरी परतल्यापासून त्यांच्या अखेरच्या दिवसांशी ते लढा देत होते. त्यांच्या प्रकृतीची बातमी कळताच अलीकडे अनेक बॉलीवूड कलाकार त्यांना भेटायला आले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. ज्युनियर महमूद यांनी एका न्यूज चॅनलसह संपर्क साधला तेव्हा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली.

ज्युनियर महमूद गेल्या काही काळापासून फुफ्फुस व यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पसरला होता आणि त्यामुळे त्यांचं वजनही सतत कमी होत होतं. सध्याची त्यांची अवस्था पाहून बॉलीवूडमधील त्यांचे अनेक मित्र खूप काळजीत असलेले पाहायला मिळाले. अशातच एका न्यूज चॅनेलसह बोलताना अभिनेत्याने आपली इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्…

मागील दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती आजारपणामुळे खालावत चालली होती. त्यांनी त्यांच्या या कॅन्सरच्या शेवटच्या दिवसांत आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या मृत्यूनंतर या जगाने केवळ हा व्यक्ती चांगला माणूस होता इतकंच बोलावं. चार लोक जरी हे बोलले तरी आपला विजय झाला असं समजा’ असं म्हणत त्यांनी आपली ही शेवटची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.

आणखी वाचा – “स्पॉटबॉयने माझ्या मुस्काटात…”, मिळालेल्या प्रसिद्धीमुळे उपेंद्र लिमयेंची बदलली होती वागणूक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले, “माझा अहंकार दुखावला अन्…

ज्युनिअर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद होतं. त्यांनी सात भाषांमध्ये २६५ सिनेमांहून अधिक सिनेमात काम केलं होतं. बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सिनेसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती.

Tags: bollywood actorentertainmentjunior mehmoodjunior mehmood deathjunior mehmood familyjunior mehmood news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
animal fame marathi actor upendra limaye talk about why he not on social media platforms see the details

"घरात ज्यांना काडीची किंमत नसते…" , सोशल मीडियाचा वापर न करण्याबाबत उपेंद्र लिमयेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले "अनेकजण खोटे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.