शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंदी चित्रपटांमध्ये काहीच दम नाही आणि…”, नसीरुद्दीन शाह यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले, “निराश होतो कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 19, 2024 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nasiruddin Shah on Hindi movie

"हिंदी चित्रपटांमध्ये काहीच दम नाही आणि...", नसीरुद्दीन शाह यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले, "निराश होतो कारण..."

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये लाखमोलाचे योगदान आहे. १९७५ पासून नसीरुद्दीन यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट नसिरुद्दिनजींनी दिले आहेत. भारतीय चित्रपटाला १०० वर्षांचा इतिहास आहे.अनेक दिग्गज कलाकारांनी आपले मोलाचे योगदान दिले असून आज संपूर्ण जगभरामध्ये भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीमधील सध्या बनणाऱ्या चित्रपटांवर नसीरुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच एका कार्यक्रामध्ये नसीरुद्दीन यांनी हिंदी चित्रपटांच्या सध्याच्या निर्मितीवर भाष्य केले आहे. (Nasiruddin Shah on Hindi movie)

नसीरुद्दीन यांचे नाव चित्रपटसृष्टीमध्ये आदराने घेतले जाते. नसीरुद्दीन यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक चित्रपट केले असून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच नसीरुद्दीन यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, नसीरुद्दीन यांच्या मते “आजकाल निर्माते हे एकसारखेच चित्रपट बनवत आहेत. अनेकदा मी निराशा होतो. त्यामुळे मी आता हिंदी चित्रपट पाहणेच बंद केले आहे.”

आणखी वाचा – “माझी बहीण रुग्णालयात आणि…” लुकवरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आयशा टाकिया, म्हणाली, “देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून…”

View this post on Instagram

A post shared by Naseeruddin Shah (@naseeruddin49)

पुढे ते म्हणतात की,”भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षांचा जुना इतिहास आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची पाळंमुळं आजही इथे खोलवर आहेत. जगभरात असलेला प्रत्येक भारतीय या संस्कृतीशी एकरूप आहे. पण जर अशा गोष्टी त्याच वेगाने आणि सतत चालू राहिल्या तर कंटाळा येईल. भारतीय पदार्थ हे हटके असल्याने आणि चविष्ट असल्याने सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. पण हिंदी चित्रपटांचे काय? हिंदी चित्रपटांवर सर्वांचेच लक्ष असते. पण यामध्ये काहीही दम राहिला नाही त्यामुळे हिंदी चित्रपटांचा कंटाळा आला आहे.”

आणखी वाचा – “माझी बहीण रुग्णालयात आणि…” लुकवरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आयशा टाकिया, म्हणाली, “देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून…”

नसीरुद्दीन पुढे म्हणाले की, “जर आपण या माध्यमाकडे केवळ पैसा कमावण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही तरच सुधारणेसाठी वाव आहे, पण आता ती वेळही हातातून निघून गेली आहे. कारण लोकांना जे चित्रपट आता पाहायला आवडत आहेत तेच चित्रपट आता बनत राहणार आणि प्रेक्षकही तसेच चित्रपट पाहत राहणार. त्यामुळे ज्यांना खरंच काहीतरी वेगळे आणि आशयघन चित्रपट बनवायचे आहेत त्यांच्यावर आता ही एक मोठी जबाबदारी आहे. आजचे वास्तव त्यांना चित्रपटातून अशा प्रकारे मांडावे लागणार आहे जेणेकरून त्यांच्या नावाचा कुणीही फतवा काढायला नको किंवा त्यांच्या दारावर ‘ईडी’ची धाड पडायला नको.”

नसीरुद्दीनजी हे आजही चित्रपटसृष्टीमध्ये महत्वपूर्ण भूमिका करत आपल्या समोर येत आहेत. याबरोबरच त्यांनी ‘यु होता तो क्या होता’ या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. मागील वर्षी ‘कुत्ते’, ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’सारख्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकले. आता ते डिज्नी प्लस हॉटस्टारच्या ‘शोटाइम’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. या सीरिजमध्ये इमरान हाशमी, श्रीया सरन, मौनी रॉय, राजीव खंडेलवालसह नसीरुद्दीन शाहसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: bollywoodfilm industryhindi film industryhindi movienaseeruddin shahnaseeruddin shah movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Pooja Sawant shared a special video of engagement ceremony with Siddhesh Chavan

Video : कुटुंबियांसमोर प्रपोज, जीवापाड प्रेम अन्...; होणाऱ्या नवऱ्यामध्ये हरवून गेली पूजा सावंत, साखरपुड्यामधील 'त्या' कृतीमुळे उपस्थितही भारावले, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.